भाजपमध्ये पहिली मोठी बंडखोरी; नाशिकमध्ये 14 नगरसेवकांचा राजीनामा

भाजपमध्ये पहिली मोठी बंडखोरी; नाशिकमध्ये 14 नगरसेवकांचा राजीनामा

नाशिकमध्ये पूर्वच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच भाजपला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

प्रशांत बाग नाशिक, 2 ऑक्टोबर : नाशिकमध्ये पूर्वच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच भाजपला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. पुण्यात कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्यासाठी तिकीट कापलेल्या आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात भाजपच्या नेत्यांना यश आलं असलं तरी नाशिकमध्ये मात्र विद्यमान आमदारांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. नाशिकमध्ये भाजपच्या 14 नगरसेवकांचा राजीनाम दिला आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातले विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी मिळावी यासाठी आमदारांनी राजीनामे दिले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत आमदार सानप यांचं नाव नसल्याने समर्थकांनी दबाव टाकायला सुरुवात केली आहे.

गिरीश महाजनांच्या शिवनेरी बंगल्यावर सानप समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केलं होतं. आता 14 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. यात 8 महिला नगरसेवक आहेत. बाळासाहेब सानप यांच्या समर्थनार्थ दिला राजीनामा दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणखीही काही नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं समजतं.

वाचा - लंडनच्या कोर्टाचा पाकला मोठा झटका; निजामाचा खजिना भारतात येण्याचा मार्ग मोकळा

पंचवटी परिसरात सानप समर्थकांनी गर्दी केली. मोठा पोलीस बंदोबस्त संध्याकाळी या परिसरात ठेवण्यात आला होता. समर्थकांची सानप यांच्या कार्यालयात मोठी गर्दी झाल्याने अतिरिक्त पोलीस कुमक दाखल झाली. बाळासाहेब सानप यांनी समर्थकांना सबुरीचं आवाहन केलं आहे.

वाचा - पंतप्रधान मोदींचं भाषण दाखविण्यास नकार, दूरदर्शनचा अधिकारी निलंबित

दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करा, असं ते सांगत होते. 'पक्षावर माझा विश्वास आहे. कुठलंही टोकाचं पाऊस उचलू नका,' असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

मनसेतून भाजपमध्ये आलेले राहुल टिकले यांना तिकीट दिल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे समर्थकांची जमवाजमव सुरू झाल्याची बातमी आहे.

VIDEO 'पाठीत खंजीर खुपसला तरी चालेल पण भाजपचा विजय असो', मेधा कुलकर्णी झाल्या भावुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 08:58 PM IST

ताज्या बातम्या