सदाभाऊंना धक्का, रविकांत तुपकर पुन्हा राजू शेटींच्या तंबूत परतणार?

सदाभाऊंना धक्का, रविकांत तुपकर पुन्हा राजू शेटींच्या तंबूत परतणार?

अंतर्गत राजकारणामुळे तुपकर यांनी राजू शेट्टींची साथ सोडली होती. आता पुन्हा ते परतणार असल्याने राजकीय समिकरणं बदलणार आहेत.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 16 ऑक्टोंबर : काही दिवसांपूर्वीच साथ सोडलेले राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक रविकांत तुपकर पुन्हा स्वाभिमानीत परतणार आहेत अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. तुपकर यांनी स्वाभिमानीला सोडचिढ्ढी देऊन सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीमध्ये प्रवेश केला होता. मात्र काही दिवसांमध्येच ते पुन्हा आपल्या मुळ घरी परतणार असल्याने राजू शेट्टींना दिलासा मिळालाय. तुपकर हे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष होते. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ते पुन्हा स्वाभिमानीत प्रवेश करतील अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. अंतर्गत राजकारणामुळे तुपकर यांनी राजू शेट्टींची साथ सोडली होती. आता पुन्हा ते परतणार असल्याने राजकीय समिकरणं बदलणार आहेत.

अजून मतदानच झालं नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीत या 4 मंत्र्यांची नावं!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला होता. 26 सप्टेबरला स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. रविकांत तुपकर हे पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक मानले जात होते. राजू शेट्टींकडे सोपवला राजीनामा रवीकांत तुपकर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा राजू शेट्टी यांना पाठवला आहे. 'मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजूर करावा' असे म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीमध्ये प्रवेश केला होता.

भाजप आमदार पुत्राचा भर सभेत पाणउतारा, सभा गुंडाळून घ्यावा लागला काढता पाय

स्वाभिमानी संघटनेत अतिशय आक्रमकपणे आंदोलन करत तुपकर कायम चर्चेत राहिले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ही राजकीय खेळी खेळल्याने अनेकांना धक्का बसला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 16, 2019, 2:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading