'काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे 'आऊट गोईंग' त्यामुळे जोरात आहे आमचं 'बोईंग'!

'काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे 'आऊट गोईंग' त्यामुळे जोरात आहे आमचं 'बोईंग'!

पवारांसोबत राहून सत्ता मिळेल असं अनेकांना कधीकाळी वाटत होतं पण आता वाटत नाही. म्हणून सगळे राष्ट्रवादी सोडताहेत. पवार साहेबांबद्दल मलाही आदर आहे पण त्यांनी मोदींवर खोटे आरोप केल्याने जनता दुरावली.

  • Share this:

हरिष दिमोटे, शिर्डी 30 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टोलेबाजी करत काँग्रेस राष्ट्रवादीवर टोलेबाजी केलीय. आठवले यांनी आज राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आठवले म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे 'आऊट गोईंग' त्यामुळे जोरात आहे आमचं 'बोईंग'. राष्ट्रवादीत राहून लवकर सत्ता मिळणार नाही अशी सगळ्यांची भावना आहे. त्यामुळे सगळे पवारांना सोडताहेत. पवार सध्या एकाकी पडताहेत त्याला आता ते तरी काय करणार असा सवालही त्यांनी केलाय.

आठवले म्हणाले, पवारांसोबत राहून सत्ता मिळेल असं अनेकांना कधीकाळी वाटत होतं पण आता वाटत नाही. म्हणून सगळे राष्ट्रवादी सोडताहेत. पवार साहेबांबद्दल मलाही आदर आहे पण त्यांनी मोदींवर खोटे आरोप केल्याने जनता दुरावली. मोदींच्या सबका साथ सबका विकास या भूमिकेसोबत सर्वांनी उभं राहीलं पाहिजे.

EVM बदला संशयाची भूमिका घेणं चुकीचं आहे. तुमची सत्ता आली तेव्हा आम्ही असे आरोप केले नाही.  EVM बदलायचं असेल तर निवडणूक आयोगाने बदलावं आमची हरकत नाही. नरेंद्र मोदींचे दिवस आलेले आहेत त्यांना आता तुम्हीही साथ द्या असं आवाहनही त्यांनी केलं.

भाजपचे 'हे' दोन नेते घेतील युतीचा निर्णय - चंद्रकांत पाटील

भुजबळांना आठवलेंची ऑफर

ज्यांना सेना भाजप नकोय त्यांनी आमच्या कडे यावं. छगन भुजबळांना सेना घेत नसेल तर त्यांनी आमच्या पक्षात यावं. ते बहुजन समाजाचे मोठे नेते असून त्यांचे माझे जुने संबंध. आहेत आरपीआय मध्ये आले तर ताकद वाढेल असंही ते म्हणाले.

आणि पवार पद्मसिंह पाटील यांच्याबद्दलच्या प्रश्नावर भडकले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सार्वजनीक कार्यक्रमात फारसे कधी चिडत नाही की रागावत नाहीत. ते कायम आपल्या संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. कुठल्याही कठीण प्रश्नावर ते अगदी संयमाने कायम उत्तरं देतात. आणि टीका करतानाही त्यांचा तोल कधी जात नाही. मात्र आज श्रीरामपूर इथं एका कार्यक्रमासाठी आलेले पवार पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर चांगलेच भडकले आणि त्यांनी त्या पत्रकाराला त्या प्रश्नाबद्दल माफीचीही मागणी केली. ज्या प्रमाणावर नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जाताहेत त्याच संदर्भातला एक प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता.

पुण्यात भाजपकडून कोणाला संधी? जागा 8 आणि इच्छुक उमेदवार तब्बल 130

राष्ट्रवादीमधून सध्या अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. राष्ट्रवादीला लागलेली ही गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. सध्या अनेक दिग्गजांची नावंही चर्चेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे बडे नेते जिथे जातील तिथे त्यांना त्याबाबतचा प्रश्न हमखास विचारण्यात येतोच. श्रीरामपूरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषेद एका पत्रकाराने पवारांना तुमच्या जवळचे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत, तुमचे अनेक नातेवाईक असेलेल नेतेही पक्ष सोडत आहेत असा प्रश्न विचारला.

VIDEO : बीडमध्ये राजकारण तापलं, पंकजा मुंडेंची अजित पवारांवर जहरी टीका

नातेवाईकांच्या प्रश्न शरद पवारांना आवडला नाही. त्या प्रश्नावर त्यांचा पारा चढला. इथे नात्याचा तुम्हा प्रश्न का विचारला असा प्रश्न त्यांनी केला. इथं नात्याचा प्रश्नच येत नाही. हा तुमचा प्रश्न हा औचित्याचा भंग करणारा आहे. याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे असं त्यांनी सुनावले आणि मी पत्रकार परिषद सोडून जातो असं ते म्हणाले. जेव्हा सगळ्यांनी त्यांना बसण्याची विनंती केली तेव्हा ते शांत झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 09:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading