आम्ही काही भिकाऱ्याची अवलाद नाही, राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल

आम्ही काही भिकाऱ्याची अवलाद नाही, राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल

'लोकांच्या आक्रोशाची तुम्ही थट्टा केलीय. आक्रोशाला शिमगा म्हणणं भाजपला महागात पडणार आहे.'

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 28 ऑगस्ट : कोल्हापूरमधला पूर ओसरला आणि आता राजकारणाला भरती आलीय. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकारच्या विरोधात स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं आक्रोश मोर्चा काढला होता. त्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. हा आक्रोश नसून शिमगा आहे असं चंद्रकांत दादा म्हणाले होते. त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी घणाघाती टीका केलीय. लोकांच्या आक्रोशाची तुम्ही थट्टा केलीय. आक्रोशाला शिमगा म्हणणं तुम्हाला महागात पडणार असल्याचा इशारही त्यांनी दिला.

राजू शेट्टी म्हणाले, पूरग्रस्तांचं अतोनात असं नुकसान झाले तरी त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. दादा, तुम्ही तर वार लावून जेवणारे आहात तुम्ही कधी कुठला व्यापार केलाय का? मग नुकसान तुम्हाला कसं कळणार? तसंच पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाला शिमगा म्हणून हिनवणे तुम्हाला महागात पडणार आहे असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. कोल्हापूरमध्ये आज पूरग्रस्त आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते हवामान खात्याच्या इशार्‍याकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यानेच महापूर आला असा आरोपही राजू शेट्टी यांनी केलाय. तसच आम्ही भिकाऱ्याची अवलाद नाही. आम्ही दहा वेळा तुम्हालाच भीक घालू शकतो इतकी क्षमता आमच्याकडे असल्याचही  राजू शेट्टी यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांमध्ये मला विरोधी पक्षनेता दिसतो, थोरातांचा पलटवार

पीककर्ज माफ होणार

अतिवृष्टीमुळे  जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत नुकसान झालेल्या पिकावरील कर्ज माफ करण्याच्या घेतलेल्या निर्णयात सरकारनं सुधारणा केलीय. पूर्वीच्या आदेशात खरीप 2019 या हंगामात घेतलेले कर्ज माफ करण्याचा उल्लेख होता. आता त्याऐवजी या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले बँकांचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. त्यामुळे सांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे.

नागपूरात पावसाचा पत्ता नाही, मात्र धरण भरलं 32 टक्के; हे आहे 'सिक्रेट'

आधीच्या आदेशात त्यामध्ये खरीप 2019 हंगामामधील पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात येईल, असे नमूद करण्यात आलं होतं. त्यामध्ये सुधारणा करून प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत बाधित शेतकऱ्याने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेलं कर्ज माफ होणार आहे. यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यानंतर पिकावरील बँकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य शासन बँकांना देणार असल्याची माहितही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 06:07 PM IST

ताज्या बातम्या