Home /News /maharashtra /

‘हाकलून दिलेल्यांसोबत जाणार नाही’, राजू शेट्टी यांनी सदाभाऊंवर केली घणाघाती टीका

‘हाकलून दिलेल्यांसोबत जाणार नाही’, राजू शेट्टी यांनी सदाभाऊंवर केली घणाघाती टीका

'ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, त्यामुळे पक्षात परत घेण्याचा प्रश्नच नाही.'

    कोल्हापूर 16 नोव्हेंबर: ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, त्यामुळे पक्षात परत घेण्याचा प्रश्नच नाही. आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा हा प्रयत्न सुरू आहे अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणखी काहीतरी पदरात पाडून घ्यायचा त्यांचा प्रयत्न आहे.  समिती नेमून सदाभाऊ खोत यांना हाकलून लावलं आहे. कडकनाथमध्ये बुडालेल्या शेतकऱ्यांचे पैसे द्या, पुतना मावशीचे प्रेम नको असंही ते म्हणाले. दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद झाल्यानंतर सदाभाऊ हे भाजपच्या तंबूत गेले तर राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीसोबत जवळीक निर्माण केली. दरम्यान, भाजपसोबत नाराज असल्याने सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्यासोबत दिलजमाईचे संकेत दिले आहेत. राजू शेट्टी यांनी लुटारूंची साथ सोडली तर त्यांच्यासोबत जाण्याची तयारी आहे असे संकेत सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत. राज कारणात कुणीच कुणाचा शत्रू नसतो. काही मतभेद असतात मात्र समाजाच्या भल्यासाठी एकत्र येऊ शकतो असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. राजू शेट्टी यांनी प्रस्थिपितांच्या बाजूने जाण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे आम्ही एकमेकांपासून दूर झालो असंही खोत यांनी म्हटलं आहे. ऊसाच्या प्रश्नावर मी जी भूमिका घेतली होती तीच राजू शेट्टी यांनी घेतली आहे. आमचं वयक्तिक भांडण नाही, शेताचंही भांडण नाही, फक्त मुद्यांवर आम्ही वेगळे झालो होते असंही ते म्हणाले. अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित; भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायांकडे एकच मागणं.. शेतकऱ्यांच्या मुद्यांवर अनेक वर्ष एकत्रित लढे आणि आंदोलने केल्यानंतर अंतर्गत राजकारण आणि मतभेद झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यापासून फारकत घेत वेगळा पक्ष स्थापन केला होता. नंतर ते फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची खास जवळीक होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकारण बदललं, सगळ्यांच्या गरजाही बदलल्या. त्यामुळे सदाभाऊ हे भाजपपासून दूर जात असल्याचं बोललं जात आहे. भाजप दुसऱ्या नेत्यांना बळ देत असल्याने खोत हे नाराज होते. नंतर त्यांची नाराजी वाढत गेली त्यामुळे ते वेगळा विचार करत असल्याचं आता बोललं जातय.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Raju Shetti (Politician), Sadabhau khot

    पुढील बातम्या