पत्रकाराला ड्रायव्हर म्हणणं म्हणजे आव्हाडांची बौद्धिक दिवाळखोरी - विखे

पत्रकाराला ड्रायव्हर म्हणणं म्हणजे आव्हाडांची बौद्धिक दिवाळखोरी - विखे

'पत्रकार नेहमी कर्तव्याची जाणीव ठेवून काम करत असतात. पत्रकराशी चांगला संबंध आणि ओळख असणं म्हणजे काही चूक नसतं. त्यावरून खालच्या पातळीवरची टीका करणं हे आव्हाडांना शोभत नाही.'

  • Share this:

शिर्डी 1 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पत्रकार परिषदेत पत्रकारावर भडकले होते. त्यावरून सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगलीय. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर ट्विट करत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरच टीका केली. त्या पत्रकाराचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतचा जुना व्हायरल झालेला फोटो ट्विट करत त्यांनी काही शेरेबाजीही केलीय. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. पत्रकारावर अशा प्रकारची शेरेबाजी करणं म्हणजे  आव्हाडांची बैद्धिक दिवाळखोरीच आहे अशी टीका केलीय.

विखे पाटील म्हणाले, पत्रकार नेहमी कर्तव्याची जाणीव ठेवून काम करत असतात. पत्रकराशी चांगला संबंध आणि ओळख असणं म्हणजे काही चूक नसतं. त्यावरून खालच्या पातळीवरची टीका करणं हे आव्हाडांना शोभत नाही त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.

नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार, आणखी काही दिग्गज होणार 'भाजप'वासी

नेमकं काय झालं होतं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सार्वजनिक कार्यक्रमात फारसे कधी चिडत नाही की रागावत नाहीत. ते कायम आपल्या संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. कुठल्याही कठीण प्रश्नावर ते अगदी संयमाने कायम उत्तरं देतात. आणि टीका करतानाही त्यांचा तोल कधी जात नाही. मात्र काल श्रीरामपूर इथं एका कार्यक्रमासाठी आलेले पवार पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर चांगलेच भडकले आणि त्यांनी त्या पत्रकाराला त्या प्रश्नाबद्दल माफीचीही मागणी केली.

ज्या प्रमाणावर नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जाताहेत त्याच संदर्भातला एक प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. राष्ट्रवादीमधून सध्या अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. राष्ट्रवादीला लागलेली ही गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. सध्या अनेक दिग्गजांची नावंही चर्चेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे बडे नेते जिथे जातील तिथे त्यांना त्याबाबतचा प्रश्न हमखास विचारण्यात येतोच. श्रीरामपूरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी काल सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषेद एका पत्रकाराने पवारांना तुमच्या जवळचे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत, तुमचे अनेक नातेवाईक असलेले नेतेही पक्ष सोडत आहेत असा प्रश्न विचारला.

मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर, भाजपमध्ये प्रवेश करणारे 'संत' नाहीत - खडसे

नातेवाईकांचा प्रश्न शरद पवारांना आवडला नाही. त्या प्रश्नावर त्यांचा पारा चढला. 'इथे नात्याचा तुम्हा प्रश्न का विचारला असा प्रश्न त्यांनी केला. इथं नात्याचा प्रश्नच येत नाही. हा तुमचा प्रश्न हा औचित्याचा भंग करणारा आहे. याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे,' असं त्यांनी सुनावल्याचं पाहायला मिळालं.

First Published: Sep 1, 2019 09:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading