‘दृश्यम’ सिनेमा पाहून 13 वर्षांच्या मुलानं केली हत्या, पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा

‘दृश्यम’ सिनेमा पाहून 13 वर्षांच्या मुलानं केली हत्या, पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा

पुण्यातील पौड रोड भागात 31 जानेवारी रोजी एका 11 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 10 फेब्रुवारी : एखादा सिनेमा पाहून त्यामुळे प्रभावित होणारी व्यक्ती हा नेहमीच संशोधनाचा आणि कुतूहलाचा विषय असतो. सिनेमातील एखाद्या आवडत्या पात्राच्या स्टाईलचं अनुकरण करण्याचा  प्रयत्न अनेक जण करतात. त्याचबरोबर सिनेमातील एखाद्या प्रसंगाचाही प्रेक्षकांवर मोठा परिणाम होत असतो. पुण्यात (Pune) काही दिवसांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपीवर अजय देवगनची (Ajay Devgan) मुख्य भूमिका असलेल्या दृश्यम (Drishyam) या सिनेमाचा प्रभाव असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील पौड रोड भागात 31 जानेवारी रोजी एका 11 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. आरोपीनं ‘दृश्यम’ सिनेमात दाखवल्याप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. या प्रकरणात पोलीसांनी 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. त्याच्या चौकशीनंतर या अंदाजावर शिक्कामोर्तब झालं आहे. या अल्पवयीन आरोपीनं ‘दृश्यम’ सिनेमा डाऊनलोड करुन अनेकदा पाहिला होता. त्या सिनेमात दाखवल्याप्रमाणे नियोजन करत त्यानं ही हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

(वाचा - पुण्याच्या रस्त्यावर थरार, गोल्डमॅन सचिन शिंदेची गोळ्या झाडून हत्या)

मृत मुलाच्या मामांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘त्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती त्याच रात्री आरोपी मुलाच्या घरी चौकशी केली होती. त्यावेळी आरोपीच्या घरच्यांनी दार उघडण्यास नकार दिला होता. तसंच या प्रकरणात आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं फोनवरुन सांगितलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते सर्व जण पुणे सोडून दुसऱ्या गावात निघून गेले. पोलिसांनी बोलावल्यानंतर ही मंडळी पुण्यात परतली.’

‘हिंदुस्थान टाईम्स’नं याबाबत दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मुलांमध्ये खेळताना वाद निर्माण झाला होता, अशी माहिती त्यांच्या एका अल्पवयीन मित्रानं दिली आहे. या प्रकरणात पुण्यातील कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(वाचा - 'कारभारी' लय भारी, वयाच्या 21 वर्षी स्नेहल झाली गावाची सरपंच!)

या प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याचं सांगत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. तर, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी मृत मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे.

Published by: News18 Desk
First published: February 10, 2021, 3:42 PM IST

ताज्या बातम्या