गुंडांच्या टोळ्यांना पोलिसांचा हादरा, तब्बल 200 जणांना करणार तडीपार

हा भाग राजकीय दृष्ट्याही संवेदनशील असल्याने अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवरही या निर्णयाकडे पाहिलं जातंय.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 06:59 PM IST

गुंडांच्या टोळ्यांना पोलिसांचा हादरा, तब्बल 200 जणांना करणार तडीपार

संदिप राजगोळकर, कोल्हापूर 28 ऑगस्ट : महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. या काळात लाखो लोक एकत्र येतात. महाउत्सव साजरा होतो. या काळात सामाजिक शांतता राखणं हे पोलिसांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असतं. ही शांतता टिकवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी गुंड आणि तथाकथीत दादांच्या टोळ्यांना जबर हादरा दिलाय. पोलिसांनी 200 गुंडांना तडीपार करण्याचा निर्णय घेतलाय. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी हा निर्णय घेतला असून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्यानं गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

VIDEO: मुंडे बहीण-भावाला डावलून वंजारी समाजाचा बीडमध्ये मोर्चा

गणेशोत्सवापासून उत्सवांना सुरूवात होते. गणेशोत्सव, गौरी, नंतर नवरात्र, दसरा आणि दिवाळी असा उत्सवांचा धडाका असतो. या काळात पोलिस खास खबरदारी घेत असतात. याचाच आधार घेत कोल्हापूर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. रेकॉर्डवरच्या विविध गँगच्या 200 गुंडांना नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांना जिल्ह्याबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याकाळात प्रतिबंध घातलेल्या परिसरात वास्तव्य केलं तर पोलीस कडक कारवाई करणार आहे.

युतीच्या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरेंचा खुलासा म्हणाले...पाहा VIDEO

पोलिसांच्या रेकॉर्डवर अशा अनेक नामचीन गुंडांची नावं असून पोलिसांना त्यांचा सगळा कळा इतिहास माहित आहेत. त्या आधारे पोलिसांनी 200 जणांची यादी तयार केलीय. खून, दरोडे, बलात्कार, लूटमार, दंगल, अपहरण, सामाजिक शांतता बिघडवणं, अवैध शस्त्र बाळगणं अशा अनेक गुन्ह्यांची नोंद या गुंडांच्या नावावर असून अनेकदा त्यांनी जेलची वारीही केली आहे.

Loading...

यातले अनेक गुंड जामीनावर सुटलेले असून काहींना अपुऱ्या पुराव्याच्या आधारावर कोर्टाने सोडलेलं आहे. तर काही शिक्षा भोगून सुटलेले आहेत. तर काही फरार झाले आहेत. याच काळात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्याची शक्यता असल्यानेही पोलीस खबरदारी घेत आहेत.

हा भाग राजकीय दृष्ट्याही संवेदनशील असल्याने अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवरही या निर्णयाकडे पाहिलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 03:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...