देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार असं सांगत अमित शहांचा शिवसेनेवर दबाव

देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार असं सांगत अमित शहांचा शिवसेनेवर दबाव

अमित शहा यांनी भाजप-सेना युतीचं सरकार येणार असं सांगितलं मात्र मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील असंही स्पष्टपणे जाहीर केलं.

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर 1 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा रविवारी रात्री सोलापूरमध्ये समारोप झाला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्यावर सडकून टीका केलीय. शरद पवार यांनी आपल्या कार्यकाळात काय केलं त्याचा जाहीर खुलासा करावा आम्ही पाच वर्षात काय केलं ते सांगू असं जाहीर आवाहनच दिलं. सभा संपताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनविण्यासाठी मतदान करा असं आवाहन करत शिवसेनेवर दबावही निर्माण केल्याचं बोललं जातंय.

मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जातंय. सत्तेची वाटणी सम-समान होणार असंही सांगितलं जातंय. या सभेत अमित शहा यांनी भाजप-सेना युतीचं सरकार येणार असं सांगितलं मात्र मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील असंही स्पष्टपणे जाहीर केलं. त्यामुळे शिवसेनेच्या दबावाचा परिणाम होणार नाही असंही स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकंलं

या सभेत काँग्रेसचे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे आमदार राणाजगजीतसिंह पाटिल आणि राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार, आणखी काही दिग्गज होणार 'भाजप'वासी

अमित शहा म्हणाले, शरद पवारजी 15 वर्षे सत्ता होती तेव्हा महाराष्ट्राला काय दिले? युपीए  सरकारने महाराष्ट्राला 1 लाख 15 हजार करोड दिले. तर भाजप सरकारने महाराष्ट्राला 2 लाख 66 हजार 354 करोड रुपये दिले. आम्ही १०० रुपये देतो आणि देवेंद्र फडणवीस १२५ रुपयाचे काम करतात. कोणत्याही पंतप्रधानात कलम ३७० रद्द करण्याची हिंमत नव्हती. आम्ही ते काम केलं.आणि शरद पवार, राहुल गांधी छाती पिटून पिटून त्याविरोधात बोलतायत.

उदयराजे भाजपमध्ये जणार

यावेळी झालेल्या जाहीर सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठा खुलासा केलाय. ते म्हणाले, आमच्यावर टीका केली जाते की आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोरं पळवतो म्हणून. पण प्रवेश करणारे हे काही लहान मुलं नाहीत. अनेक मोठे नेते प्रवेश करताहेत. उदयनराजे, धनंजय महाडीक हे भाजपमध्ये प्रवेश करताहेत, करणार आहेत ही सगळी मंडळी समजदार आहेत. ते का असा निर्णय घेत आहेत याचा त्यांनीच विचार करावा असा टोही त्यांनी लगावला.

'बाप्पां'च्या आगमनाला पावसाची हजेरी!

या सभेत काँग्रेसचे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे आमदार राणाजगजीतसिंह पाटिल आणि राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते 7 सप्टेंबरला राज्याच्या दौऱ्यावर येणार असून दिवसभरात मुंबई, नागपूर आणि औरंगाबादला त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जे राजकीय वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष मोदींच्या दौऱ्याकडे लागलं आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून काही दिग्गज पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजमध्ये प्रवेश करू शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे विरोधीपक्षांवरचा दबावही आणखी वाढलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 09:53 PM IST

ताज्या बातम्या