पिंपरीत झालं बोगस मतदान, पाच जण ताब्यात

पिंपरीत झालं बोगस मतदान, पाच जण ताब्यात

बोगस मतदान करणारे पाचही जण हे परप्रांतिय असून स्थानिक लोकांच्या नावावर ते मतदान करून गेल्याची कबुली त्यांनी दिलीय.

  • Share this:

पिंपरी 21 ऑक्टोंबर : मतदानाच्या काळात बोगस मतदान रोखण्यासाठी आयोग सर्व काळजी घेत असते. मतदान केंद्रावर हजर असलेले सर्व पक्षांचे प्रतिनिधीही मतदान चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी काळजी घेत असतात. असं असतानाही पिंपरीत बोगस मतदान झाल्याचं आढळून आलंय. पिंपरी गावातल्या विद्यानिकेतन शाळेतल्या बुथ क्रमांक 303 वर हे बोगस मतदान झालं. शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी याबाबतची तक्रार केलीय. त्यानंतर पोलिसांनी असं मतदान करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतलंय. बोगस मतदान करणारे पाचही जण हे परप्रांतिय असून स्थानिक लोकांच्या नावावर ते मतदान करून गेले. आपण बोगस मतदान केल्याचं त्यांनीही कबूल केल्याची माहिती दिली जातेय. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून बोगस मतदान रोखण्याचं निर्धारही पोलिसांनी व्यक्त केलाय. सोलापूर आणि विदर्भातही निवडणुकीच्या काळात हिंसाचाराच्या घटना घडल्याने गालबोट लागलंय.

वो क्या जंग लड़ेंगे हमसे जो खुद मन से हारे हैं, पंकजा मुंडे व्यक्त केल्या भावना

मोर्शीत उमेदवारावरच हल्ला

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघात कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी धनोडी वरुड गावापासून 6 किमी अंतरावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला चढवला. यात देवेंद्र भुयार बचावले असले तरी त्यांची कार मात्र पूर्णतः जळून राख झाली आहे. या घटनेनंतर भुयार यांच्या कार्यकाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. रक्तदाब कमी झाल्याने भुयार यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन देवेंद्र भुयार यांची भेट घेऊन चौकशी केली,  वाहनावर हल्ला करून कार जाळण्यात आल्याची कबुली खुद्द पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. देवेंद्र भुयार यांचा वाहन चालक व एका साथीदाराला वरुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोर्शी मतदार संघात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केलंय.

मनोहर जोशींनी दिला शिवसेना-भाजपला घरचा अहेर, म्हणाले...

करमाळ्यातही हाणामारी

करमाळ्यात मतदानला गालबोट लागलंय. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांनी असा आरोप केलाय.या मारहाणीत नारायण पाटलांचे कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. कार्यकर्त्यांच्या डोक्यात मारहाण झाल्याने कार्यकर्ता जखमी झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2019 01:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading