मुलांना मराठ्यांचा इतिहास कळावा म्हणून पोलिस अधिकाऱ्याने असा दाखवला 'पानिपत'

मुलांना मराठ्यांचा इतिहास कळावा म्हणून पोलिस अधिकाऱ्याने असा दाखवला 'पानिपत'

एखाद्या चित्रपटाचा आपल्यावर परिणाम झाला की त्यातील पात्रे आपल्यात भिनायला वेळ लागत नाही.

  • Share this:

वीरेंद्र उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,13 डिसेंबर: एखाद्या चित्रपटाचा आपल्यावर परिणाम झाला की त्यातील पात्रे आपल्यात भिनायला वेळ लागत नाही. पानिपत चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पंढरपूर पोलिस कर्मचाऱ्याबाबत असेच काहीसे घडले. हर्षद गलिंदे हे पंढरपूर येथे पोलीस खात्यात कार्यरत आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल गलिंदे यांनी आपल्या दोन लहान मुलांची पानिपतमधील पात्राप्रमाणे वेशभूषा करून त्यांनी थेट चित्रपट गृहात आणून त्यांना 'पानिपत' सिनेमा दाखवला.

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानिपत' चित्रपट येणार याची हर्षल गलिंदे आतुरतेने वाट पाहत होते. पानिपतमध्ये झालेले युद्ध मोठं प्रसिद्ध आहे. मराठा सैन्याने उपाशी असतानाही अब्दालीची फौज कापून काढली होती. विजय जवळ आला होता पण विश्वासरावाच्या मृत्यूने युद्धभूमीवरील चित्र पालटले आणि मराठ्यांचा पराभव झाला. हा सर्व प्रसंग पहिल्यांदा चित्रपटाच्या माध्यमातून गोवारीकर यांनी पडद्यावर जिवंत केला आहे. इतिहास पुढच्या पिढीला या माध्यमातून समजणार आहे. हाच इतिहास आपल्या मुलांना समजावा, हर्षल गलिंदे यांनी हा चित्रपट आपल्या मुलांना दाखवायचे ठरवले. चित्रपट दाखवताना गलिंदे यांनी आपल्या दोन्ही मुलांना चित्रपटातील वेशभूषा केली. तसे कपडे शिवून घेतले. पानिपत पाहायला जाताना ते कपडे परिधान करून दोन्ही मुले आणि गलिंदे कुटूंब चित्रपट गृहात आले होते.

'पानिपत' सिनेमा का पाहावा? राज ठाकरेंनी केलं 'हे' आवाहन

सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक सिनेमांची चलती आहे. बाजीराव मस्तानी, पद्मावत, मणिकर्णिका असे एकामागोमाग एक ऐतिहासिक सिनेमा रिलीज झाले त्यानंतर आता ‘पानिपत’ सिनेमा रिलीज झाला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबदद्ल ट्वीटकरून सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. पानिपतचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे राज ठाकरे यांचे चांगले मित्र आहे. राज यांनी पानिपत सिनेमाबद्दल ट्वीट केलं आहे.

'पानिपतची लढाई ही मराठेशाहीनी हरलेली म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याचा अविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटकेपार झेंडा नेणारी मराठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतची लढाईकडे पहावंच लागेल. गोवारीकर यांचा पानिपत चित्रपट हा प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे संपूर्ण भारतीयांनी पाहावा', असं आवाहन राज ठाकरेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 09:40 PM IST

ताज्या बातम्या