प्रसिद्ध उद्योजकानंतर आता युवक जागीच ठार, पंढरपुरात सलग दुसऱ्या दिवशी काळाचा घाला

प्रसिद्ध उद्योजकानंतर आता युवक जागीच ठार, पंढरपुरात सलग दुसऱ्या दिवशी काळाचा घाला

स्विफ्ट कार आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात सांगोल्याचा युवक जागीच ठार झाला.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर, 14 जानेवारी : पंढरपूर-मोहोळ मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात झाला आहे. इश्वरवठार फाट्याजवळ मंगळवारी मध्यरात्री हा अपघात घडला. स्विफ्ट कार आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात सांगोल्याचा युवक जागीच ठार झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सांगोल्यात एक युवक आपल्या मित्रांसह स्विफ्ट कारने प्रवास करत होता. मात्र पंढरपूर-मोहळ मार्गावर त्यांची कार पिकअपला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत अपघातातील एकाने आपला प्राण सोडला होता. तर इतर 4 जण सध्या गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पंढरपूर-मोहळ या मार्गावरील हा सलग दुसरा अपघात आहे. सोमवारी पंढरपुरातील प्रसिद्ध उद्योजक महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी यांचे अपघातात (Accident) निधन झाले. कामानिमित्त मित्रांसोबत बाहेरगावी गेलेल्या सागर दोषी यांचा घरी परतत असताना अपघात झाला. गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची फॉर्च्युनर गाडी पलटली. या भीषण अपघातात सागर दोषी यांच्या जागेवरीच मृत्यू झाला.

'मला तुम्ही खूप आवडता' म्हणणाऱ्या डॉक्टरविरोधात महिलेची तक्रार, गुन्हा दाखल होताच बिल्डिंगवरून मारली उडी

पंढरपूर (Pandharpur) येथील महालक्ष्मी मसालेचे मालक अशोक दोशी यांचे सुपुत्र सागर दोशी यांनी नुकतीच महालक्ष्मी फर्निचरच्या व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू केली होती. सागर दोशी आणि मित्र परिवार कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. परतीच्या प्रवासात उशीर झाल्याने ते पंढरपूर- मोहोळ रोडवरील साईराज हॉटेल येथे जेवण्यासाठी थांबले होते.

जेवणानंतर परतताना फॉर्च्युनर गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी 4 पलट्या घेऊन आदळली. त्यामध्ये सागर दोशी गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडले. गाडीतील 4 व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर दोशी यांचा मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा पंढरपुर शहरात चांगला संर्पक होता.

First published: January 14, 2020, 2:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading