पंढरपूरच्या हिंदू संमेलनात 'नथुराम गोडसे अमर रहे' च्या घोषणा!

पंढरपूरच्या हिंदू संमेलनात 'नथुराम गोडसे अमर रहे' च्या घोषणा!

काही दिवसांपूर्वीच भाजप खासदारने नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यावरून देशभर वादळ निर्माण झालं होतं.

  • Share this:

विरेंद्र उत्पात, पंढरपूर 03 डिसेंबर : पंढरपूरमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेनं घेतलेलं जागो हिंदू संमेलन वादात सापडलंय. या हिंदू संमेलनात अनेक कट्टर संघटना आणि नेत्यांनी सहभाग घेतला होता. यातल्या अनेकांनी भावना भडकविणारी भाषणं तर केलीच पण त्याच बरोबर महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा गौरवही केला. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या सभेत बोलताना वादग्रस्त मिलिंद एकबोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय. हिंदू संतांची त्यांनी मदत केली नाही त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं अशी टीकाही एकबोटे यांनी केलीय. संमेलनात बोलणारे अनेक वक्ते हे नथुराम गोडसे हे कशाप्रकारचे देशभक्त होते याची भलामण करण्याचा प्रयत्न करत होते तर अनेक जण नथुराम गोडसे अमर रहे अशा घोषणा देत होते. या आधीही नथुराम प्रकरणावरून देशभर अनेकदा वादळ निर्माण झालं होतं.

PM नरेंद्र मोदींनी दिलेल्या मंत्रिपदाच्या ऑफरवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

काही दिवसांपूर्वीच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यांनी संसदेत नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर वाद झाल्याने त्यांना लोकसभेत माफीही मागावी लागली होती. भाजपनेही त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्याची शिक्षा म्हणून त्यांची संसदेच्या संरक्षण सल्लागार समितीतूनही हकालपट्टी करण्यात आली होती.

एकबोटेंची मुक्ताफळं

एकबोटे पुढे बोलताना म्हणाले,  एकबोटे म्हणाले, प्रताप गडाच्या पायथ्याशी अफजल खानाचे थडगे आहे. ते थडगे काढण्याऐवजी त्याला जागा मिळत आहे. मात्र समाज उपयोगी कामं करत असलेल्या बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम पाडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. अखिल भारत हिंदू महासभाच्या वतीने पंढरपुरात जागो हिंदू संमेलन घेण्यात आलंय. त्यात विविध संप्रदायांच्या नेत्यांनी सहभाग घेतला.

देवेंद्र फडणवीसांनी केला पंकजा मुंडे यांना फोन, म्हणाले...

या संमेलानात प्रभावी गोरक्षण, हिंदुत्वावरील आघात, तीर्थक्षेत्रांचं पावित्र्य, बालयोगी सदानंद महाराज आश्रम बचाव या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अखिल भारत हिंदुमहासभेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक उपस्थित होते. कत्तलखान्यातील पैसे हे दहशतवादासाठी जातात. यामुळे कत्तलखाने बंद केले पाहीजे असल्याचे सांगितले.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 3, 2019, 6:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading