पंढरपुरात शरद पवारांचा भाजपला दे धक्का, भालके 'भाजप'ऐवजी 'राष्ट्रवादी'त जाणार

यावेळी रयतकडून या जागावर ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंढरपूरात परिचारक विरुद्ध भालके असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 03:04 PM IST

पंढरपुरात शरद पवारांचा भाजपला दे धक्का, भालके 'भाजप'ऐवजी 'राष्ट्रवादी'त जाणार

सागर सुरवसे, सोलापूर 30 सप्टेंबर : निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातलं राजकारण अनेक वळणं घेतय. पंढरपूरमधले काँग्रेसचे आमदार भारत भालके आत्तापर्यंत भाजपमध्ये जाणार असं बोललं जात होतं. भालकेंनी तशी पूर्वतयारीही केली होती. मात्र स्थानिकांचा विरोध वाढल्याने भालकेंनी आता राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीला गळती लागलीय अनेक दिग्गज पक्ष सोडून गेलेत. त्या पार्श्वभूमीवर भारत भालकेंचं राष्ट्रवादीत येणं हे पक्षाला दिलासा देणारं ठरणार आहे. भारत भालकेंना राष्ट्रवादीत घेऊन शरद पवारांनी भाजपला दे धक्का दिलाय अशी चर्चा आहे. दांडगा जनसंपर्क, लोकांशी थेट संपर्क असलेले भालके हे जिल्ह्याच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ. मात्र गेल्या 4 वर्षांमधल्या राजकारणामुळे भालके हे काँग्रेसमध्ये फारसे रुळले नाहीत.

CM फडणवीसांचं अजित पवारांना थेट आव्हान, गोपीचंद पडळकरांना बारामतीतून उतरवणार

गेल्या काही वर्षीत ते जास्तच नाराज झाले आणि भाजपकडे त्यांचा कल वाढत गेला. काही वर्षांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आषाढीच्या महापूजेला विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पूजा रद्द करावी लागली होती.

मात्र यावर्षी आषाढी महापूजेसाठी पंढरपूरात आलेले मुख्यमंत्री पाहुणचारासाठी चक्के भालकेंच्या घरी गेले होते. त्यामुळे भालकेंचं भाजपमध्ये जाणं हे पक्क समजलं जात होतं. मात्र भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक आणि स्थानिक नेते समाधन औताडे यांनी भालकेंच्या भाजप प्रवेशाला विरोध केलाय.

राष्ट्रवादीला मोठा धक्का, तिकीट दिलेल्या महिला उमेदवार करणार भाजपमध्ये प्रवेश

Loading...

त्यातच ही जागा सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला सोडण्याची निर्णय भाजपने घेतले होता. त्यामुळे शरद पवारांनी ही संधी साधत भालकेंच्या हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला.

भालके हे 2009मध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव करून ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांचा हा विजय चांगलाच गाजला होता. 2014मध्ये ते काँग्रेसच्या तिकीवरून निवडून आले. यावेळी रयतकडून या जागावर ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंढरपूरात परिचारक विरुद्ध भालके असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 03:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...