देवदर्शन ठरलं मृत्यूचं कारण, भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा अंत

देवदर्शन ठरलं मृत्यूचं कारण, भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा अंत

हा अपघात येवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झालाय. तर टँकर पलटी झाला.

  • Share this:

पंढरपूर 01 फेब्रुवारी : वेळापूरजवळ शनिवारी (ता.1) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास टँकर व कारचा अपघात झाला आहे. यामध्ये पाचजण जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत . मृत्यू झालेले सर्व वैराग ( ता . बार्शी ) येथील आहेत. वैराग येथील फलफले कुटूंबीय जेजुरी येथे सकाळी देवदर्शनाला जात होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. वेळापूरजवळ पुणे-पंढरपूर महामार्गावर कार आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरची समोरासमोर धडक झाली . या भीषण अपघात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाला. कार पुण्याहून वैरागकडे येत असताना हा अपघात झाला. अपाघातातील सर्वजण सोलापूर जिल्ह्यात वैराग येथील आहेत.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गाडीत आठजण होते. त्यातील पाच जण ठार झाले आहेत. तर तीनजण गंभीर जखमी झाले. जखमी मध्ये तीन वर्षांची लहान मुलीचा समावेश आहे व त्याच्यावर वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी वेळापूर पोलिस दाखल झाले आहेत.

'नरेंद्र मोदी सरकारचं 'बजेट'म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू'

हा अपघात येवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झालाय. तर टँकर पलटी झाला. रस्त्यावरून जाणार्या लोकांनी जेव्हा हा अपघात पाहिला तेव्हा तेही हादरुन गेले. त्यांनी तत्काळ मदतकार्याला सुरुवात केली आणि जखमींना बाहेर काढलं. पोलिसांनाही माहिती दिली गेली. नंतर त्यांच्या उपचाराची व्यवस्थाही लोकांनी केली.

Budget 2020 : 'बजेट'मधल्या या आहेत 15 महत्त्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात नेमकी चूक कुणाची आहे याचा आता पोलीस तपास करत आहेत.

 

First published: February 1, 2020, 3:47 PM IST
Tags: accident

ताज्या बातम्या