सोलापुरात पाझर तलाव फुटला, सुमारे 100 एकर शेतात घुसले पाणी

सोलापुरात पाझर तलाव फुटला, सुमारे 100 एकर शेतात घुसले पाणी

सोलापूर जिल्ह्यात मान्सूनोत्तर पावसाने तीन दिवसांपासून घातलेय थैमान घातले आहे

  • Share this:

सागर सुरवसे,(प्रतिनिधी)

सोलापूर,23 ऑक्टोबरः बार्शी तालुक्यातील लाडोळे गावातील सदानंद पाझर तलाव फुटून सुमारे 100 एकर शेतात पाणी घुसून पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात मान्सूनोत्तर पावसाने तीन दिवसांपासून घातलेय थैमान घातले आहे. नागझरी आणि भोगावती नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक वर्षांनंतर या नद्यांना पूर आला आहे. उजनी धरणातून 30 हजार क्युसेक व वीर धरणातून 50 हजार क्युसेकचा विसर्ग सोडल्यामुळे भीमा नदीलाही पूर आला आहे.

दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा यामुळे मान्सूनोत्तर पाऊस सक्रिय झाला असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात मंगळवारी दमदार पावसाची नोंद झाली. विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यातील सात मंडळांत अतिवृष्टी झाली. या पावसामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा मिळाला असला तरी खरिपाच्या काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्रात भोर आणि पारनेर येथे अतिवृष्टीची नोंद झाली. पुणे, नगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

दिवाळीतही पावसाचा मुक्काम...

कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट..

कुलाबा वेधशाळेने बुधवारसाठी (23 ऑक्टोबर) बीड, उस्मानाबाद, सोलापूर, नगर, पुणे, साताऱ्यासह कोकणातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट अर्थात अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. लातूर तालुक्यात गेल्या चार दिवसांत पडलेल्या पावसामुळे मांजरा नदीवरील उच्चस्तरीय बंधाऱ्यांत पाणी साठले आहे. नागझरी येथील बंधाऱ्यांचे ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले छायाचित्र. या पावसामुळे लातूर शहरावरील पाणी संकट दूर झाले आहे.

SPECIAL REPORT:दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 08:50 AM IST

ताज्या बातम्या