सांगली 04 ऑगस्ट: सांगलीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती पाठोपाठ आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील एका विभागाच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा हादरून गेली असून त्यांच्या संपर्कात असलेल्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाने कोरोनाला दूर थांबवले होते. या कार्यालयात एकालाही लागण झालेली नव्हती. मात्र गेल्या महिनाभर जिल्ह्यात रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. जून महिनाअखेरीस 385 असलेली रुग्णसंख्या साडेतीन हजाराच्या घरात गेली आहे.
त्यामुळे कुणाला कोरोना आहे आणि कुणाला नाही हे तपासणेच आता कठीण आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ महिलेला अधिकाऱ्याला कोरोनाने ग्रासल्याने झाल्याने धक्का बसला आहे.
‘हर्ड इम्युनिटीने व्हायरस संपणार नाही’, कोरोनावरच्या अभ्यासाचे निष्कर्ष
राज्यात 3 ऑगस्ट 2020 पर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 04 लाख 50 हजार 196 एवढी झाली आहे. राज्यात Active रुग्णांची संख्या 1,47,018 एवढी झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 15,842 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज 46 जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत 6493 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 3 ऑगस्टला राज्यात 266 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आजपर्यंत रुग्णांची एकूण संख्या 1,17,406 एवढी झाली आहे. मुंबई 20,528 एवढे रुग्ण Active आहेत अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडले. गेल्या 24 तासांत 52 हजार 050 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 803 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 55 हजार 746 झाली आहे. यात 5 लाख 86 हजार 298 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 12 लाख 30 हजारहून अधिक रुग्ण निरोगी झाले आहे.
Covaxin लशीची मानवी चाचणी अडचणीत, व्हॉलेंटिअरच्या शरीरात दिसून आली वेगळीच लक्षणं
इंडियन काउन्सिल ऑफ रिसर्च (ICMR) नुसार देशात आतापर्यंत 2 कोटी 8 लाख 64 हजार 750 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल 6 लाख 61 हजार 182 लोकांची चाचणी करण्यात आली.