कोल्हापूर 12 जून: कोरोना व्हायरसी भीती आता सर्वच लोकांमध्ये पसरली आहे. खेड्या पाड्यांमध्ये त्याबाबत जनजागृती झाली आहे. शहरात पोलीस आणि प्रशासन नागरिकांना सतर्क करत आहे. तर खेड्यांमध्ये ग्रामपंचायत आणि नागरीक मिळून उपाय योजना करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या म्हसवे ग्रामपंचायतीने तर एक खास नोटीस काढून लोकांना सावध केलं आहे. ग्रामदेवतेच्या पुजेसाठी कुणीही जमू नका किंवा पाहुण्यालाही बोलावू नका अशी नोटीस काढलीय. या नोटीसीने सोशल मीडियावर धम्माल केली आहे.
ग्रामदेवतेची पूजा असल्याने ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून ही नोटीस काढली आहे.
अशी आहे ‘म्हसवे’ ग्रामपंचायतीची नोटीस
सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की. दि.12 जुन रोजी आपल्या म्हसवे गावाची मिरगी म्हाई करण्यात येणार आहे. म्हाई ही घरातल्या घरात करावी. कोणीही बाहेर गावातील पै पाहुणे बोलाऊ नये. कोणीही देवळात नैवेद्य दाखवायला जाऊ नये. सर्वानी घरातुनच नैवेद्य दाखवावा. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास खालील प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
नैवेद्य दाखवायला आल्यास 300/-
घरी 1 पाव्हणा दिसल्यास 300/-
घरी 2 पाव्हणे दिसल्यास 600/-
2 पेक्षा जास्त पाव्हणे दिसल्यास 1000/- रुपये
असे दंड आकारण्यात येतील. याची सर्व ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी.
वरील कामाची अंमलबजावणी करण्यासाठी कोरोना स्वयंसेवक कमिटी तील 60 स्वयंसेवक कार्यरत असतील.
या पैकी अंबाबाई देवालयात 5 जन.
मरगुबाई देवालयात 5 जन.
आणि 50 स्वयंसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी ,पोलिसपाटील ,ग्रामसेवक ,सरपंच ,तलाठी व कोतवाल, हे गावात येणार्या पाहुण्यांच्याकडुन सक्तीने दंड वसूल करतील.
हुकुमावरून
कोरोना दक्षता समिती व
ग्रामपंचायत म्हसवे
हेही वाचा -
या मोठ्या राज्यात लपवले 200 कोरोना रुग्णांचे मृत्यू, माहिती उघड झाल्याने खळबळ!
'धनंजय मुंडेंची दोनदा कोरोना चाचणी झाली पण...', राजेश टोपेंचा मोठा खुलासा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.