राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कुणात नाही - अजित पवार

राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कुणात नाही - अजित पवार

ज्यांना विश्वासू म्हणून पवार साहेबांनी प्रत्येक क्षणाला साथ दिली, पदं आणि सत्ता दिली त्यांनी साहेबांची साथ सोडून मोठं पाप केलंय.

  • Share this:

हरिष दिमोटे, अकोले 23 सप्टेंबर : राष्ट्रवादीत अनेक दशकं काढलेले आणि नुकतेच भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचडांच्या बालेकिल्ल्यात आज अजित पवार यांची तोफ धडधडली. ज्यांना पवार साहेबांनी भरभरून दिलं त्यांनी पवारांची साथ सोडून मोठं पाप केलंय असं म्हणत त्यांनी पिचडांवर जोरदार हल्ला चढवलाय. आमचं सरकार आलं तर संपूर्ण कर्जमाफी देवू. जर दिली नाही तर पवारांची औलाद असल्याचं सांगणार नाही असं आव्हानही त्यांनी दिलं.  अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले, तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे कोणात तुमच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत नाही म्हणत त्यांनी पिचडांवर टीका केली. ते पुढे म्हणाले, ज्यांना विश्वासू म्हणून पवार साहेबांनी प्रत्येक क्षणाला साथ दिली, पदं आणि सत्ता दिली त्यांनी साहेबांची साथ सोडून मोठं पाप केलंय.

'युती'चं अखेर ठरलं, उद्या होणार घोषणा; फडणवीस-ठाकरे शिष्टाई फळाला

पिचडांचे पारंपरिक विरोधक असलेले भाजपा नेते अशोक भांगरे, जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे, जिल्हा परिषद सदस्य डॉ.किरण लहामटे यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. मधुकर पिचड यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा नारा देत सर्वपक्षीय विरोधकांची मोट राष्ट्रवादीकडून बांधली जातेय. अशोक भांगरे, मधुकर तळपाडे, सुनिता भांगरे,  सतीष भांगरे आणि डॉ. किरण लहामटे यांच्यासह अनेक जण निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत त्यामुळे एकत्र आलेल्या या पैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. मात्र पिचडांच्या  कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी न पडता एकत्र राहून लढा द्या असं आवाहनही त्यांनी केलं.

उदयनराजेंकडून भाजपला पहिलं सरप्राईज, पक्षाध्यक्षांच्या मेळाव्याला गैरहजर

कर्जतमध्ये अजित पवारांनी केली खेळी, राम शिंदेंच्या अडचणी वाढणार

महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीत जाहीर झाल्यानंतर राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. या निवडणुकीत काही हायप्रोफाईल लढतींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघाचाही समावेश आहे. कारण या  मतदारसंघात अहमदनगरचे पालकमंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी आव्हान दिलं आहे. मात्र अशातच राम शिंदे यांना धक्का बसला आहे.

भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघातून तृतीयपंथीय लढवणार निवडणूक

राम शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यासोबतच उपसभापती राजश्रीताई सूर्यकांत मोरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत मोरे यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी साथ सोडल्याने राम शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 08:59 PM IST

ताज्या बातम्या