शाळेबाहेर वडिलांची वाट बघत होती मुलगी, नराधनाने अपहरण करुन केला बलात्कार

शाळेबाहेर वडिलांची वाट बघत होती मुलगी, नराधनाने अपहरण करुन केला बलात्कार

हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जिंवत जाळल्याच्या घटनेनंतर देशभरात रान पेटले असताना

  • Share this:

हरीश दिमोटे,(प्रतिनिधी)

शिर्डी,14 डिसेंबर: हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जिंवत जाळल्याच्या घटनेनंतर देशभरात रान पेटले असताना एका शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपरगाव येथे ही घटना घडली आहे. 9 वर्षीय शालेय मुलीवर अत्याचार करून नराधम फरार झाला आहे.

मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे एका नऊ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीच अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असुन या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय. पीडित चिमुरडीवर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत असून शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर वडीलांची वाट बघत उभ्या असलेल्या नऊ वर्षीय शाळकरी मुलीस वडीलांनी घ्यायला पाठवलंय असं सांगत एका तरूणाने तिचे मोटर सायकलवरून अपहरण केले आणि गावापासून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी एका ठिकाणी आरोपीने सदर मुलीला सोडून देत मोटरसायकल टाकून पोबारा केला. मुलीस मारहाण करुन आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याच पोलिस तपासात निष्पन्न झाले असून कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्कार, अपहरण, पॉक्सो तसेच अँट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सुरूवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.

दरम्यान, आरोपी गावात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोटारसायकलवरुन पीडित मुलीस घेऊन जात असताना कैद झाला आहे. सदर आरोपी हा ऊस तोडणी कामगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून दीड महिन्यांपासून तो या परिसरात राहात असल्याचीही माहिती आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

आई-मुलाच्या नात्याची हत्या.. जन्मदात्रीवरच बलात्कार

दुसरीकडे, आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं आपण नेहमी ऐकतो आणि उदाहरणही देतो. एक आई आपल्या लेकरासाठी सर्वकाही असते. पण, नऊ महिने पोटात ठेवून लहानाचा मोठा केलेल्या एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याची अत्यंत किळसवाणी आणि घृणास्पद घटना औरंगाबादेत घडली.

आईच्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात स्वतःच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, मागील तीन महिन्यांपासून स्वतःच्या जन्मदात्या आईवर हा नराधम मुलगा अत्याचार करत होता. शुभम भालेराव (वय 20) असं या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शहरातील सिडको परिसरात आपल्या दोन मुलांसह राहते. पीडित महिलेच्या पतीचं सात वर्षांपूर्वी निधन झालं. या महिलेल्या दोन मुलीही आहे. आरोपी शुभम भालेराव (वय 20) हा पीडित महिलेचा मोठा मुलगा असून त्याला दारू पिण्याचं व्यसन जडलं होतं. तसंच तो काहीही काम करत नव्हता. शुभम हा दारू पिण्यासाठी नेहमी पीडित महिला आणि त्यांच्या मुली जेव्हा घरी येतात. तेव्हा मारहाण करून दारूसाठी पैसे मागायचा आणि जीवे मारण्याची धमकी द्यायचा. दारूच्या आहारी गेलेल्या या नराधम मुलाने पीडित महिलेवर गेल्या तीन महिन्यापासून अत्याचार केले.

तसंच आपण केलेल्या या काळ्या कृत्याची कुठे वाच्यात होऊ नये म्हणून तो पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी द्यायचा आणि स्वत: आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा. आपल्या मुलाच्या या काळ्या कृत्यामुळे या महिलेला मानसिक धक्का बसला होता.

दिनांक 10 डिसेंबर रोजी आरोपी शुभम हा संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास दारू पिऊन घरी आला. पीडित महिला ही घरी एकटीच असताना आरोपीने बळजबरीने तिच्या अत्याचार केला. त्यानंतरही पीडितेला मारहाण करून "गुपचूप बस आरडा ओरडा करू नकोस नाहीतर तुला मारून टाकेल", अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

अखेर आपल्याच मुलाकडून होत असलेल्या अत्याचारामुळे हादरालेल्या या महिलेनं दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीडिते महिलेची हकीकत ऐकल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. या पीडित महिलेनं आपल्याला न्याय द्यावा, अशी विनंतही पोलिसांना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 06:30 PM IST

ताज्या बातम्या