'एल्गार वाल्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता; त्यांच्यामुळेच..', संजय राऊत भडकले!

'एल्गार वाल्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता; त्यांच्यामुळेच..', संजय राऊत भडकले!

यावेळी संजय राऊतांनी शेतकरी आंदोलनाबाबत आपलं मत व्यक्त केलं.

  • Share this:

नाशिक, 6 फेब्रुवारी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर आगपाखड केली. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत गंभीर नाही, असं म्हणता शेतकरी हिंसक झाले तर सरकार जबाबदार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. केंद्र सरकारबरोबरच एल्गार परिषदेवरही टीकास्त्र सोडलं. यावेळी ते म्हणाले की, एल्गार वाल्यांनी मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे.

त्यांच्यामुळे राज्यात वातावरण बिघडत आहे. यापुढे त्यांना परवानगी देण्याबद्दल विचार करावा लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. एल्गार परिषदेत भडकाऊ भाषण करणारा शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली असून योगी सरकारने आमच्या पोलिसांना सहकार्य करावं, असंही त्यांनी आवाहन केलं आहे.

हे ही वाचा-मोठी बातमी! आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी No Test; केंद्र सरकारचा नवा प्लान

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

- केंद्र सरकार, शेतकरी आंदोलनाबाबत गंभीर नाही. शेतकरी हिंसक झालं तर सरकार जबाबदार. सरकारला शेतकऱ्यांनी हिंसक व्हावं ही अपेक्षा आहे का ? कृषी कायदे मागे घेऊन चर्चा करावी. देशात अराजकता निर्माण व्हावी असं सरकारला वाटतं. जनतेपूढे अहंकार चालत नाही. बहुमत आहे म्हणून अहंकार योग्य नाही. हे राजकीय पक्षांचे नाही तर किसान संघटनांचे आंदोलन आहे.

- सरकारने केलेल्या शिफारशी स्वीकारणं राज्यपालांना बंधनकारक असतं. केंद्रानं राज्यपालांना परत बोलवावं. तर दुसरीकडे फासे टाकण्यासाठी फडणवीसांना शुभेच्छा. 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. पेट्रोल भाव नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करावी. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असावं हे ठरलंय

Published by: Meenal Gangurde
First published: February 6, 2021, 3:26 PM IST

ताज्या बातम्या