मतदारांना पैसे वाटताना रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले

रोख रक्कम आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे स्टिकर असलेले तीन मोबाइल सापडले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 04:47 PM IST

मतदारांना पैसे वाटताना रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले

अहमदनगर,21 ऑक्टोबर: कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे मतदारांना पैशाचे वाटप करताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ताब्यात घेतलेले दोघे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे कार्यकर्ते असल्याचे समजते. भरारी पथक आणि कर्जत पोलिसांनी रविवारी रात्री 11 वाजता ही कारवाई केली.

किशन जाधव असे एकाचे नाव असून तो पारवाडी (ता. बारामती) येथील रहिवासी आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे स्टिकर असलेले तीन मोबाइल सापडले आहेत. दोघेही रोहित पवार यांच्या कार्यालयात कामाला असून त्यांच्याच ऑफिसमधून आलो असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. कर्जत पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांचे पुतणे रोहित पवारविरुद्ध भाजप मंत्री राम शिंदे असा रंगतदार सामना आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराने मतहारांना अडवले..

दुसरीकडे, बीड शहरातील एका मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी बोगस मतदानाचा आरोप करत गोंधळ घातला आहे. एका मतदात्याला मतदानापासून आडवण्यात आले आहे. बीडमध्ये तसेच बोगस मतदानाचा असल्याचा आरोप करत संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

क्षीरसागर काका-पुतण्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोप

Loading...

बीड शहरातील बालेपीर मधील इंदिरा माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रात होत असलेल्या मतदानाबाबत संदीप क्षीरसागर यांनी आरोप करत बोगस मतदान होत असल्याचा दावा केला आहे.या बाबतीत थेट मतदारांना अडवून दमदाटी केली असे वीडियो मधून दिसत आहे.या बाबतीमध्ये मतदारांना आडवले आहे मात्र तसे पाहिले तर या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे. यामुळे हा गोंधळ नेमका कशामुळे झाला हे प्रशासन तयार नाही. मात्र संदीप क्षीरसागर यांनी केलेले आरोप पाटोदा मतदारसंघांमधून बीड मतदारसंघांमध्ये वोटिंग साठी बोगस मतदार आणल्याचा दावा केला आहे. शिक्षण संस्थेवरील कर्मचारी यांच्यासह 20 लोकांची यादी दाखवत आहेत मात्र या बाबतीत मतदार यादीत नाव असेल तर मतदाना पासून रोखू नये..असे जिल्हाअधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले.

घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 04:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...