Home /News /maharashtra /

माझ्या निवृत्तीचा अनेकांचा प्लॅन होता पण..., शरद पवारांचा फडणवीसांना टोला

माझ्या निवृत्तीचा अनेकांचा प्लॅन होता पण..., शरद पवारांचा फडणवीसांना टोला

' पुष्पगुच्छ दिला म्हणजे तुम्ही निवृत्त व्हा असं सांगितलं असावं. काही हरकत नाही. मला निवृत्त करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला.'

बारामती 17 जानेवारी : बारामतीतल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घघाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच बारामतीत आले आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचं उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केलं. यावेळी पवार आणि ठाकरे यांची केमेस्ट्री पुन्हा एकदा बघायला मिळाली. उद्घघाटन समारंभानंतर झालेल्या सभेत बोलताना शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. ते म्हणाले, इथं आल्यानंतर मला लोकांनी पुष्पगुच्छ दिला. पुष्पगुच्छ दिला म्हणजे तुम्ही निवृत्त व्हा असं सांगितलं असावं. काही हरकत नाही. मला निवृत्त करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. मात्र ते काही घडलं नाही. लोकांनीच तो प्रयत्न हाणून पाडला असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान देवेेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या स्टाईलचं राजकारण आता संपलं अशी टीका केली होती. उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य प्रदर्शन पाहण्यासाठी जाताना अजित पवार हे गाडी चालवत होते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही वेळ गाडीत बसले. त्यावेळी गाडीत बसताना ठाकरे म्हणाले, आमच्या गाडीच्या चाव्या या अजित दादांकडेच आहेत. यावेळी अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आले होते मात्र ते काहीच बोलले नाहीत.

काँग्रेसने डोळे वटारताच राऊतांनी मागे घेतलं इंदिरा गांधींबद्दलचं 'ते' वक्तव्य

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी इथे पाहायला ऐकायला आलो आहे. पण मुख्यमंत्री आहे म्हणून कळो न कळो बोलावं लागतं. तंत्रज्ञान वगैरे शब्द वापरले की लोकांना वाटतं मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. आता व्हर्टिकल गार्डन सोबत व्हर्टिकल शेती आलीय. काँग्रेसला अंडरवर्ल्डचं फंडिंग होतं का? फडणवीसांची काँग्रसेला प्रश्नांची सरबत्ती महाराष्ट्राच्या भूमी चमत्कार जन्माला येतो. चंद्रपूरच्या शेतकऱ्याने तांदळाची जात, वाण आणलं त्याला घड्याळाचं नाव दिलं HMT. मला सुप्रियाने विचारलं तुमचं घड्याळाचे दुकान आहे का? मी म्हटलं नाही. घड्याळ वाले माझे पार्टनर आहेत. वेळ यावी लागते. योग्य वेळी सत्ता आली आहे. यामुळं आता सुजलाम सुफलाम करून दाखवू. मी सुद्धा बारामतीला येत जात राहणार आहे. सगळे बरोबर आहेत. अजित दादाही आहेत.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Devendra fadanavis, Sharad pawar

पुढील बातम्या