किरण मोहिते, सातारा 22 सप्टेंबर : उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. ताकद दाखविण्यासाठी राष्ट्रवादीने सगळा जोर लावला होता. अनेक दिग्गज साताऱ्यात दाखल झाले होते. शहरातून रॅली काढून पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आपल्या भाषणात पवार नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणच पवारांनी उदयनराजेंतं नाव न घेतला त्यांच्यावर सडकून टीका केली आणि विधानसभा निवडणुकीत घरा घरात घड्याळ पोहोचवा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले, पूर्वी बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा राजा होता आणि आज टीव्हीवर पाहिलं कोणी कोणाला पगडी घातली ते. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा कधी चुकीचा रस्ता धरणार नाही. असं करणार्यांना आम्ही रस्ता दाखविणार आहोत.
विदर्भातले 'हे' फायरब्रॅण्ड अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात
खाजगी बॅकांमध्ये उद्योजकांनी कर्ज काढलेत, बँक बंद पडू लागल्या म्हणुन सरकारने बॅंकेला पैसे दिले पण शेतकऱ्यांनी कर्ज काढले आणि थकले तर त्यांची भांडी बाहेर काढली जातात असं हे सरकार आहे. गिरण्या गेल्या, नोकर्या गेल्या त्या ठिकाणी इमारती उभा राहिल्या. महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले किल्ले विकायला काढले. आता त्याठिकाणी हॉटेल काढणार आहेत.
'फेसबुक पोस्ट'वरून चर्चेला उधाण.. राष्ट्रवादीसह आणि पवार साहेबांचा फोटो गायब
दुसऱ्या पक्षात जाणारे विकासचं कारण सांगून गेले मात्र राष्ट्रवादी ने संधी दिली, सत्ता दिली. 15-20 वर्ष मंत्रिपदं भोगली. मात्र आज सांगताय विकास करायचा आहे. एवढी वर्ष सत्ता होती तेव्हा काय केलं. मला कबुल आहे की जयंतरावांचा यांचा सल्ला ऐकला नाही. केवळ या गादीचा अभिमान आहे म्हणुन मी दुर्लक्ष केलं असंही पवार म्हणाले. उद्याच्या 21 तारखेला मतदान आहे. आसपासच्या भागात एक ही माणूस सोडू नका प्रत्येकाला भेटून त्याच्यापर्यंत घड्याळ पोहोचवा असा आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा