सुप्रिया सुळेंनी थेट सत्ताधाऱ्यांना केले 'हे' ओपन चॅलेंज, म्हणाल्या...

सरकारने माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवावी, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारला आव्हान दिले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 03:46 PM IST

सुप्रिया सुळेंनी थेट सत्ताधाऱ्यांना केले 'हे' ओपन चॅलेंज, म्हणाल्या...

सागर सुरवसे, (प्रतिनिधी)

सोलापूर, 25 ऑगस्ट- एकीकडे राज्यासह देशभरात ईडी आणि सीबीआयचे छापे पडत असतानाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला ओपन चॅलेंज दिले आहे. सरकारने माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवावी, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारला आव्हान दिले आहे. सरकार विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप विरोधक करत असतानाच सुप्रिया सुळेंच्या या चॅलेंजमुळे विरोधकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी 'ताईंशी संवाद' या कार्यक्रमादरम्यान त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले. या वक्तव्यामुळे सुप्रिया सुळे यांचा आक्रमक पवित्रा यावेळी पाहायला मिळाला.

सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील वाहनांवर दंडात्मक कारवाई..

वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील आठ गाड्यांवर शहर वाहतूक पोलिसांनी प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली आहे. समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तीबरोबर संवाद साधण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे सोलापुरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Loading...

दरम्यान, सध्या सुप्रिया सुळे यांचा संवाद दौरा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेतून सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. अजित पवारांचे नाव टीआरपीचा विषय असल्यानं महाराष्ट्र सहकार बँकेच्या घोटाळ्यात सरकारकडून त्यांचे नाव पुढे केले जाते आहे, असा आक्षेप सुप्रिया सुळेंनी घेतला. तसेच मुख्यमंत्र्यांनी सहकाराचा उल्लेख स्वाहाकार असा केला होता. त्यावरूनही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचा असंवेदनशील असा उल्लेख केला होता.

VIDEO: खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2019 03:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...