महाविकास आघाडीचा शपथविधी झाल्यानंतर शरद पवारांना आला बारामतीचा फोन आणि....

महाविकास आघाडीचा शपथविधी झाल्यानंतर शरद पवारांना आला बारामतीचा फोन आणि....

' देशातील प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्राचा हा बारामती पॅटर्न यशस्वी करा आणि देशात नव्या राजकारणाची सुरूवात करा.'

  • Share this:

जितेंद्र जाधव, बारामती 28 नोव्हेंबर : शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीहून माजी नगराध्यक्ष सदाशिव बापू सातव यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या, यावर पवार यांनी बारामतीत काय चाललंय असे विचारले..... आणि दोघांमध्ये संवाद रंगला. आता हाच पॅटर्न तुम्ही देशभर राबवा असं त्यांनी पवारांना आवाहन केलं. सातव पवारांना म्हणाले, ज्या पद्धतीने राज्यामध्ये आपण किंगमेकर म्हणून नेतृत्व केले. त्याच पद्धतीने देशातील प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्राचा हा बारामती पॅटर्न यशस्वी करावा. अशी भावनात्मक विनंतीही सातव यांनी केली. यावर पवार यांनी सातव यांना विचारले बारामतीत काय चाललंय?

त्यावर सातव यांनी सांगितले..

पवार साहेब आपण केलेल्या नेतृत्वामुळे बारामतीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी बारामतीत एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करून आनंद व्यक्त केलाय. आपण महाराष्ट्राच्या भल्या करीता केलेलं नेतृत्व केलं. त्यास अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांची साथ मिळाली. आता महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त देइल. यात मात्र शंका नाही. अशी भावनांही माजी नगराध्यक्ष सदाशिव (बापू) सातव यांनी पवार यांच्याजवळ व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा!

देवेंद्र फडणवीसांवर डागली पहिली तोफ

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारवर पहिली तोफ डागलीय. भाजपने फडणवीस यांचीच विरोधीपक्ष नेते म्हणून निवड केलीय. त्यामुळे या पुढची लढाई कशी राहिल याचे संकेत मिळाले आहे. नव्या सरकारचा जो किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यात घोषणांचा पाऊस आहे मात्र राज्याच्या मागासलेल्या भागासाठी काहीही नाही अशी टीका फडणवीसांनी केलीय. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!

महाराष्ट्रात नवं पर्व : उद्धव ठाकरे यांनी घेेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महाराष्ट्रात नव्या राजकीय पर्वाला सुरूवात झाली. उद्धव यांनी शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र उज्ज्वल प्रगती करेल अशा शुभेच्छाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्या. पंतप्रधानांसोबतच अनेक नेत्यांनीही उद्धव यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

First published: November 28, 2019, 9:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading