राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणाऱ्यांना रुपाली चाकणकर यांनी वाहिली श्रद्धांजली

पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप- शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 06:48 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणाऱ्यांना रुपाली चाकणकर यांनी वाहिली श्रद्धांजली

विरेद्रसिंह उत्पात, (प्रतिनिधी)

पंढरपूर, 21 ऑगस्ट- पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप- शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पदे उपभोगून झाल्यानंतर पक्ष सोडून जाणाऱ्यांना आम्ही श्रद्धांजली वाहत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

रिक्त झालेल्या जागेवर नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळेल. राष्ट्रवादीचे सदस्य जोमाने कामाला लागले असून अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन यशस्वी होतील, असे रुपाली चाकणकर यांनी मत मांडले आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांना चक्क श्रद्धांजली अर्पण केल्याने प्रदेशाध्यक्ष म्हणून एक प्रकारे रुपाली चाकणकर यांनी दमदार एंट्री केली आहे. विरोधकांनाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. खासदार उदयनराजे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजे यांनी मंगळवारी रात्री प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, उदयनराजे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीबरोबरच खासदारकीची पोटनिवडणूक शक्य असेल तर राजीनामा देण्याची तयारीही उदयनराजे यांनी दाखवली आहे.

राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता...

Loading...

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला परत एकदा मोठा धक्का बसू शकतो. उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. उदनराजेंनी भाजपप्रवेश केल्यास राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्यासह महाराष्ट्रातील इतर भागातही उदयनराजेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी कोणते नेते युतीच्या वाटेवर?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असणारे पद्मसिंह पाटील घराणे देखील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पद्मसिंह पाटलांसह त्यांचा मुलगा आमदार राणाजगजितसिंह भाजपात जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटणचे नेते रामराजे निंबाळकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. रामराजे आणि भाजप नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याचीही माहिती आहे. करमाळ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल, माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे, तसच बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे ही भाजप आणि शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.

कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2019 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...