जय हो...रोहित पवारांसाठी 28 जेसीबींमधून उधळला गुलाल!

जय हो...रोहित पवारांसाठी 28 जेसीबींमधून उधळला गुलाल!

अतिशय अटीतटीच्या लढतीत रोहित पवार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राम शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

  • Share this:

साहेबराव कोकणे, जामखेड 1 नोव्हेंबर : कर्जत-जामखेडमधून विजय मिळविल्यानंतर शुक्रवारी नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी विजयी मिरवणूक काढली. तरुणाईचा जोश, ढोलताशांचा धडाका आणि प्रचंड गर्दीत जामखेडमध्ये ही मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत जेसीबी मिशिन्सच्या साह्याने गुलाल उधळण्यात आला. हा गुलाल उधळण्यासाठी तब्बल 28 जेसीबी मिशिन्स सर्व शहरातल्या चौकात लावण्यात आल्या होत्या. रोहित पवार असलेली गाडी जशी चौकात येत होती तसं कार्यकर्ते जेसीबीतला गुलाल उधळत होते. त्यामुळे सगळं शहर गुलालात माखलं गेलं होतं. अतिशय अटीतटीच्या लढतीत रोहित पवार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राम शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

...तर महाराष्ट्रात लागू शकते राष्ट्रपती राजवट - मुनगंटीवार

शरद पवारांचे नातू असल्याने रोहित यांच्या लढतीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. रोहित यांची ही पहिलीच निवडणूक होती तर शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होते. विजयानंतर रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या घरी जावून त्यांची भेटही घेतली होती. त्यांच्या या कृतीचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं. रोहित पवार विजय झाल्यानंतर प्रथमच विजय रॅलीसाठी जामखेडमध्ये आले होते. आज जामखेड मध्ये तर उद्या कर्जत मध्ये पुन्हा रॅली काढण्याचे येणार आहे.

'नवीन सरकार लवकर येणं आवश्यक कारण....' शरद पवारांनी व्यक्त केली खरी काळजी

रोहित पवारांची भावनिक पोस्ट

काही दिवसांपूर्वीच आमदार  रोहित पवार यांनी मतदारांना भावनिक साद घालणारं आवाहन केलं होतं. Facebookवर एक पोस्ट लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. लोक जसं कौतुक करतात तसच ते कानही धरतात. त्यामुळे लोकांचा अपेक्षाभंग होऊ नये यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिल. लोकांनी जो विश्वास आणि प्रेम व्यक्त केलं त्याचं उतराई होण्याची मी ग्वाही देतो असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. अतिशय अटीतटीच्या लढतीत रोहित पवारांनी राम शिंदे यांचा केलेला पराभव लक्षणीय ठरलाय.

कर्जत-जामखेडच्या या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीचा आश्वासक चेहेरा म्हणून रोहित पवारांना राष्ट्रवादीत पाहिलं जातं. शरद पवारही त्यांना सतत मार्गदर्शन करत असतात. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या आवाहनाकडे पाहिलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 05:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading