मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आनंदराव पाटलांच्या हत्येनंतर आणखी एका राष्ट्रवादी नेत्याची हत्या, धारधार शस्त्रांने वार करून संपवलं

आनंदराव पाटलांच्या हत्येनंतर आणखी एका राष्ट्रवादी नेत्याची हत्या, धारधार शस्त्रांने वार करून संपवलं

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सांगली, 07 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे कवठेमहांकाळ तालुक्याचे नेते व माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांचा खून झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील देशींग येथे अज्ञातांनी धारधार शस्त्रांनी हल्ला करत खून केला आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील देशींग येथील बोरगाव रस्त्यावर बोलत थांबले असता अचानक काही अज्ञातांनी येऊन पाटील यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला. पाटील यांना गंभीर जखमी करत हल्लेखोर पसार झाले. यानंतर तिथे असणाऱ्या ग्रामस्थांनी पाटील यांना तातडीने मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, घाव वर्मी बसल्याने पाटील यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

इतर बातम्या - सांताक्रूझमध्ये जवळच्या मित्रांनी घरात बोलवून केला मैत्रिणीवर बलात्कार आणि हत्या

मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणाऱ्या पाटील हे गावचे उपसरपंच राहिले आहेत. तसेच 2017 मध्ये पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक लढवत विजयी झाले होते. कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती पद ही पाटील यांनी भूषवले आहे. सध्या पाटील हे कवठेमहांकाळ येथील महंकाली साखर कारखान्याचे संचालक होते. तर खुनाच्या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

इतर बातम्या - मलालावर गोळ्या झाडणारा दहशतवादी तुरुंगातून पळाला, Audio Clip मधून दिली माहिती

या खून प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठणायत गुन्हा दाखल झाला आहे. तर पूर्ववैमनस्यातुन हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी गतीने तपास सुरू केला आहे. चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांच्या हत्येची घटना घडली होती. आणि बुधवारी आणखी एक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांच्या हत्येचा प्रकार घडल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या - अगदी सोपं, ‘आधार’ची माहिती द्या आणि पॅन कार्ड त्वरित मिळवा!

First published:

Tags: Sangli