मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पालकमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच अजित पवारांनी उडवली अधिकाऱ्यांची झोप

पालकमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच अजित पवारांनी उडवली अधिकाऱ्यांची झोप

अजित पवारांच्या दौऱ्याची सुरुवातच भल्या पहाटेपासून झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ झाल्याचं बघायला मिळालं.

अजित पवारांच्या दौऱ्याची सुरुवातच भल्या पहाटेपासून झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ झाल्याचं बघायला मिळालं.

अजित पवारांच्या दौऱ्याची सुरुवातच भल्या पहाटेपासून झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ झाल्याचं बघायला मिळालं.

पुणे, 10 जानेवारी : पुण्याचं पालकमंत्रिपद स्वीकारताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला कामाला लावलं आहे. पुण्यात आज अजित पवारांच्या दौऱ्याची सुरुवातच भल्या पहाटेपासून झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ झाल्याचं बघायला मिळालं. अजित पवार यांची प्रशासनावर असलेली पकड हा याआधीही चर्चेचा विषय झाला आहे. पुण्यात अजित पवारांनी साईट व्हिजिटची वेळ सकाळी सात-साडेसातची ठेवल्याने काही पोलीस अधिकारी तर बिगर आंघोळीचेच साईटवर पोचल्याची जोरदार चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवारांचा सुपरफास्ट पुणे दौरा पुणे दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांनी सकाळी सात वाजताच औंधमधील पोलीस गृहनिर्माण प्लॉटची पाहणी केली. त्यानंतर ते शिवाजीनगरमधील पोलीस मुख्यालयात आले. तिथंही त्यांनी पोलीस गृहनिर्माण प्रकल्पाच्या बांधकाम साईटची पाहणी केली. त्यानंतर ते रेस्ट हाऊसला बैठकीला गेले. तिथून पुढे पुन्हा झेडपी अध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती असा त्यांचा भरगच्च दौरा आहे. अजित पवारांच्या या सुपरफास्ट दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपला पुन्हा धक्का, मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला दरम्यान, अजित पवार हे आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना त्यांची प्रशासनावर असलेली पकड राज्याला पाहायला मिळाली होती. तसंच सकाळी लवकर काम सुरू करण्याची त्यांची शैली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांना अजित पवारांचा कोणता गुण तुम्हाला भावतो? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सकाळी लवकर उठून सात वाजता लोकांची कामे सुरू करण्याचा त्यांचा गुण सगळ्यांनीच शिकण्यासारखा आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Ajit pawar, NCP

पुढील बातम्या