सोलापूर, 17 सप्टेंबर: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यात जोश भरण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनी चार हुतात्म्यांना अभिवादन करत रॅली काढली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अमित शहा, तसेच पक्षांतर केलेल्या नेत्यांवर टीका केली आणि मी अजून तरुण आहे असं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.