थरार...नगरमध्ये भरदिवसा उद्योगपतीचं अपहरण, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पळवलं

थरार...नगरमध्ये भरदिवसा उद्योगपतीचं अपहरण, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पळवलं

चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांना पकडले. त्यानंतर एका गाडीत घातलं आणि सुसाट निघाले.

  • Share this:

साहेबराव कोकणे, अहमदनगर 18 नोव्हेंबर : नगरमध्ये आज एका उद्योगपतीच्या अपहरणाच्या घटनेनं खळबळ उडालीय. भरदिवसा त्यांच्या राहत्या घरून अपहरण करण्यात आल्याने नगर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. करीमभाई हुंडेकरी असं त्या उद्योगपतींचं नाव असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेनं व्यापारी वर्गात खळबळ उडालीय. नगरमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गेली काही वर्ष कायम टीका केली जात होती.  आता या अपहरणाच्या घटनेमुळे पोलिसांना आपली कार्यक्षमता सिद्ध करावी लागणार आहे. करीमभाई हुंडेकरी यांचा नगरमध्ये चांगला व्यवसाय आहे. ते सकाळी नेहमीप्रमाणं सकाळी आपल्या घराबाहेर असताना ही घटना घडली. त्याचवेळी चार ते पाच जणांची एक टोळी त्यांच्या घराजवळ आली आणि त्यांनी हुंडेकरी यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कारमध्ये पळवून नेलं त्यांचं अपहरण का झालं याचा शोध सुरू आहे.

महाराष्ट्रात सत्तेची समीकरणं जुळतानाच नरेंद्र मोदींनी केलं राष्ट्रवादीचं कौतुक

करीमभाई हुंडेकरी हे सकाळी घराबाहेर पडलेले असताना चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांना पकडले. त्यानंतर एका गाडीत घालून पळवून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांकडून हुंडेकरी यांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलीस सर्वच बाजुंनी तपास करत असून नाकाबंदी करण्यात आलीय. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून काही शोध लागतो का याचाही शोध पोलीस घेत आहेत. अपहरणाच्या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी एक पथकही स्थापन केलं होतं.

शिवसेनेची अभूतपूर्व कोंडी! भाजपशी काडीमोड पण नव्या संसारातही कुरबुरी

चार तासानंतर सापडले उद्योगपती

अपहरण झालेले प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी पोलिसांना जालन्यात सापडले, अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना नगरमधून पळवून जालन्यात सोडून दिलं. या प्रकरणामागे नेमकं काय आहे याचा छडा आता पोलीस लावत आहेत.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: November 18, 2019, 5:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading