लहान मुलांची लग्ने होतात माझं का नाही, असं म्हणत त्याने आईच्या डोक्यात घातली कुऱ्हाड

लहान मुलांची लग्ने होतात माझं का नाही, असं म्हणत त्याने आईच्या डोक्यात घातली कुऱ्हाड

साताऱ्यातील मोराळे गावात ही घटना घडली आहे. खून करणारा मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • Share this:

सातारा,12 डिसेंबर: लहान मुलांची लग्न होतात माझं का नाही, असं म्हणत एकाने आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन तिचा खून केला आहे. साताऱ्यातील मोराळे गावात गुरुवारी ही घटना घडली आहे. खून करणारा मुलगा किरण शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आई-लेकराच्या नात्याची 'हत्या', मुलाने केला जन्मदात्रीवरच बलात्कार

दुसरीकडे, आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं आपण नेहमी ऐकतो आणि उदाहरणही देतो. एक आई आपल्या लेकरासाठी सर्वकाही असते. पण, नऊ महिने पोटात ठेवून लहानाचा मोठा केलेल्या एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याची अत्यंत किळसवाणी आणि घृणास्पद घटना औरंगाबादेत घडली आहे.

आईच्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात स्वतःच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, मागील तीन महिन्यांपासून स्वतःच्या जन्मदात्या आईवर हा नराधम मुलगा अत्याचार करत होता. शुभम भालेराव (वय 20) असं या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शहरातील सिडको परिसरात आपल्या दोन मुलांसह राहते. पीडित महिलेच्या पतीचं सात वर्षांपूर्वी निधन झालं. या महिलेल्या दोन मुलीही आहे. आरोपी शुभम भालेराव (वय 20) हा पीडित महिलेचा मोठा मुलगा असून त्याला दारू पिण्याचं व्यसन जडलं होतं. तसंच तो काहीही काम करत नव्हता. शुभम हा दारू पिण्यासाठी नेहमी पीडित महिला आणि त्यांच्या मुली जेव्हा घरी येतात. तेव्हा मारहाण करून दारूसाठी पैसे मागायचा आणि जीवे मारण्याची धमकी द्यायचा. दारूच्या आहारी गेलेल्या या नराधम मुलाने पीडित महिलेवर गेल्या तीन महिन्यापासून अत्याचार केले.

तसंच आपण केलेल्या या काळ्या कृत्याची कुठे वाच्यात होऊ नये म्हणून तो पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी द्यायचा आणि स्वत: आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा. आपल्या मुलाच्या या काळ्या कृत्यामुळे या महिलेला मानसिक धक्का बसला होता.

दिनांक 10 डिसेंबर रोजी आरोपी शुभम हा संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास दारू पिऊन घरी आला. पीडित महिला ही घरी एकटीच असताना आरोपीने बळजबरीने तिच्या अत्याचार केला. त्यानंतरही पीडितेला मारहाण करून "गुपचूप बस आरडा ओरडा करू नकोस नाहीतर तुला मारून टाकेल", अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

अखेर आपल्याच मुलाकडून होत असलेल्या अत्याचारामुळे हादरालेल्या या महिलेनं दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीडिते महिलेची हकीकत ऐकल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. या पीडित महिलेनं आपल्याला न्याय द्यावा, अशी विनंतही पोलिसांना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 09:09 PM IST

ताज्या बातम्या