पंढरपुरात खळबळ... गुप्तांग कापलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

पंढरपुरात खळबळ... गुप्तांग कापलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुप्तांग कापलेल्या अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंग उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,22 नोव्हेंबर: पंढरपूर स्टेशन रोडवरील खादी ग्रामोद्योग परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुप्तांग कापलेल्या अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर शहरांमधील मध्यवर्ती ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी दहा वाजता उघड झाला. सदर व्यक्तीचे गुप्तांग कापण्यात आले आहे. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पंढरपूर येथील स्टेशन रोडवरील तुती रेशीम उत्पादन कथा कोष खरेदी कक्षाजवळ गुरुवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर तत्काळ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, खून झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. घटनास्थळी पोलिसांनी एकच गर्दी केली आहे.

अनैतिक संबंधातून 2 मजूर महिलांची निर्घृण हत्या

दरम्यान, एक नव्हे अनेकांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथे 2 मजूर महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी अवघ्या 12 तासांत पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. कैलास गाढे, लक्ष्मण निकम अशी दोन्ही आरोपींची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. आरोपी कैलास गाढे याने 50 वर्षीय मजूर महिलेच्या गळ्यावर चाकुचे वार केला तर याच वेळी तिच्यासोबत असलेल्या 55 वर्षीय दुसऱ्या मजूर महिलेवर लक्ष्मण निकम याने चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली.

रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथील 2 मजूर महिला सोमवारी (18 नोव्हेंबर) सकाळी चारा आणण्यासाठी जातो, असे सांगून घरून गेल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाही. मंगळवारी (19 नोव्हेंबर) दुपारी खेडी शिवारात असलेल्या कपाशी व तुरीच्या शेतात दोन्ही महिलांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मंगळवारी पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

अनेक वर्षांपासून होते अनैतिक संबंध...

मिळालेली माहिती अशी की, एका महिलेचे आरोपी कैलास गाढे याच्यासोबत अनेक वर्षापासून तर दुसऱ्या महिलेचे लक्ष्मण निकमशी वर्षभरापासून अनैतिक संबंध होते. या दोन्ही मैत्रिणी होत्या. या महिलांना पिकांच्या चोरीची सवय होती. मात्र, गाढेला अशी चोरी केल्याचे आवडत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात कायम वाद होत होता.

दोन्ही महिलांचा काटा काढायचा म्हणून गाढे आणि निकम याने निर्धार केला. सोमवारी दुपारी खेडी शिवारात गाढे व निकम हे दोघे त्या महिला शेताकडे गेले. जातांना आरोपींनी चाकू सोबत नेले होते. तिथे भेटीनंतर गाढेने संशयावरून वाद घातला आणि सोबत आणलेल्या चाकूने गळ्यावर वार केला. दुसरी महिला या हत्येचा बोभाटा करेल म्हणून थोड्या अंतरावर निकमने तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली.

First published: November 22, 2019, 12:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading