उसणवारीचे पैसे मगितल्याच्या रागातून दगडाने ठेचून खून, नगरमधील घटना

उसणवारीचे पैसे मगितल्याच्या रागातून दगडाने ठेचून खून, नगरमधील घटना

उसणवारीचे पैसे मागितले म्हणून एकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,31 ऑक्टोबर- उसणवारीचे पैसे मागितले म्हणून एकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाळू बजरंग पवार (वय-40, रा. कोष्टी गल्ली, खर्डा, ता.जामखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील खर्डा गावात तणाव परसला आहे. या प्रकरणी सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड) या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, मृत बाळू पवारची मावशी वेणुबाई बाजीराव काळे यांनी जामखेड पोलीसात फिर्याद दिली आहे. सर्व आरोपी फरार आहेत. सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या बाळूचा मृतदेह खर्डा येथे आहे. तसेच खर्डा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. खर्डा येथे वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रॅकींग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल खर्डा येथे दाखल करण्यात आले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण, निलेश कांबळे खर्डा गावात तळ ठोकून आहेत.

घरकाम येत नाही म्हणून गरोदर पत्नीचा केला खून

दरम्यान,तुला काम येत नाही, स्वयंपाक करता येत नाही, असे म्हणून पतीने तीन महिन्यांच्या गरोदर पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना माजलगाव (जि.बीड) हरकी लिमगाव येथे गेल्या आठवड्यात घडली होती. या प्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. जयश्री गणेश जगधने असे मृत महिलेचे नाव आहे. केकर जवळा (ता. मानवत) येथील रामप्रसाद विठोबा हालबुर्गे यांची मुलगी जयश्रीचा विवाह फेब्रुवारी महिन्यात माजलगाव तालुक्यातील हारकी लिमगाव येथील गणेश सर्जेराव जगधने याच्याशी झाला होता. लग्नानंतर तिला दोन-तीन महिने चांगले नांदवले, परंतु नंतर तिला तुला काम करता येत नाही, स्वयंपाक नीट करता येत नाही, असे म्हणून तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला गेला. ही बाब जयश्रीने आपल्या आई, वडिलांना माहेरी गेल्यानंतर सांगायची. मी नांदायला जाणार नाही म्हणून ती दोन महिने माहेरी राहिली. मात्र सासरा सर्जेराव जगधने यांनी आम्ही तिला चांगली नांदवू या अटीवर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सासरी नांदायला आणले. रामप्रसाद हे गावातील लोकांसह माजलगावात आले असता त्यांना मुलगी जयश्री मृत झाल्याचे आढळून आले. त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून जयश्रीचा सासरच्या मंडळींनी खून केल्याची फिर्याद दिली. या प्रकरणी पती गणेश सर्जेराव जगधने, सासरा सर्जेराव सटवाजी गजधने, सासू मुक्ताबाई सर्जेराव जगधने, दीर महेश सर्जेराव जगधने, ज्योतीराम नवनाथ जगधने, तुकाराम जगधने यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

First published: October 31, 2019, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading