सोलापुरात शरद पवारांच्या कन्येच्या ताफ्यावर कारवाई, पोलिसांनी दंडही आकारला

सोलापुरात शरद पवारांच्या कन्येच्या ताफ्यावर कारवाई, पोलिसांनी दंडही आकारला

सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील आठ गाड्यांवर शहर वाहतूक पोलिसांनी प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, (प्रतिनिधी)

सोलापूर, 25 ऑगस्ट- वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील आठ गाड्यांवर शहर वाहतूक पोलिसांनी प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली आहे. समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तीबरोबर संवाद साधण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे सोलापुरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, सध्या सुप्रिया सुळे यांचा संवाद दौरा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेतून सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. अजित पवारांचे नाव टीआरपीचा विषय असल्यानं महाराष्ट्र सहकार बँकेच्या घोटाळ्यात सरकारकडून त्यांचं नाव पुढे केले जाते आहे, असा आक्षेप सुप्रिया सुळेंनी घेतला. तसेच मुख्यमंत्र्यांनी सहकाराचा उल्लेख स्वाहाकार असा केला होता त्यावरूनही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचा असंवेदनशील असा उल्लेख केला.

सुप्रिया सुळेंनी आज पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं त्यावेळी त्या बोलत होत्या. 'मोदी सरकारच्या वाढत्या दडपशाहीमुळे जनताही मतं मांडू शकत नाही'. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देशातल्या मंदीबाबत बोलताना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य माणूस भरडला जात असल्याचा आरोपही सुप्रिया यांनी केला आहे. दरम्यान, आजच अरणगावात सुळेंच्या जनसंवाद यात्रेचा समारोपही करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार...

आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे. त्यांच्याकडे भ्रष्टाचाराची भरपूर खाण तयार झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी भुसावळ येथे पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला चोख प्रत्युत्तर दिले. संवादयात्रे दरम्यान सुप्रिया सुळे यांनी, 'आमच्याकडे असल्यावर वाईट आणि भाजपकडे गेल्यावर चांगले भाजपकडे अशी कुठली वॉशिंग पावडर आहे?', असा खोचक सवाल करत भाजपचा खिल्ली उडवली होती.

अजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: August 25, 2019, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading