‘तुम्हाला मते देऊन आमचा काही उपयोग झाला नाही’, कामगारांचा अमोल कोल्हेंसमोर तक्रारींचा पाढा

‘तुम्हाला मते देऊन आमचा काही उपयोग झाला नाही’, कामगारांचा अमोल कोल्हेंसमोर तक्रारींचा पाढा

'कामगार आपल्या हक्काची लढाई लढत आहे तर दुसरीकडे राजकीय मंडळी कामगारांचे प्रश्न सोडवण्याऐवजी कागदी आदेशाची वाट पाहतात.'

  • Share this:

राजगुरुनगर 08 मार्च :  लोकसभा निवडणुकीनंतर शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जनता दरबार राजगुरुनगर येथे पहिल्यांदाच भरला. या जनता दरबारात सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सुटतील या आशेने अनेकांनी जनता दरबारात हजेरी लावली आणि आपल्या प्रश्नांचा पाढा मांडला मात्र कामगारांसह शेतकऱ्यांनी असंख्य प्रश्न या जनता दरबारात मांडले मात्र अनेकांची निराशाच झाली. राजगुरुगनगरला शनिवारी दिवसभर सुरू असलेला शिरूरचे  खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पहिला वहिला  जनता दरबार रात्री उशिरा पर्यंत सुरूच होता मात्र उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता डॉ कोल्हे यांची चांगलीच दमछाक झाली. चाकण एमआयडीसी व खेड सेझ परिसरात शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या मात्र कामगारांच्या हाती काम मिळालं नाही शेतीला पाणी नाही हाताला काम नाही असं म्हणत कामगारांनी खासदार कोल्हे यांच्या जनता दरबारात प्रश्न मांडला मात्र कोल्हे यांना अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.

कामगार आपल्या हक्काची लढाई लढत आहे तर दुसरीकडे राजकीय मंडळी कामगारांचे प्रश्न सोडवण्याऐवजी कागदी आदेशाची वाट पाहतात. साहेब तुमच्या एका फोन नी आमची नोकरी आम्हाला मिळेल, तुम्हाला मते देऊन आमचा काही उपयोग झाला नाही असं  त्रासलेल्या कामगारांनी खासदार अमोल कोल्हेंसमोरच आपली व्यथा मांडली.

मुलाने विचारलं आई तू का हरली? पंकजा मुंडेंनी दिलं हे उत्तर

जनता दरबारात मोठ्या संख्येने अधिकारीवर्ग कामगार शेतकरी व्यवसायिक असे सर्वजण वेगवेगळ्या समस्या घेऊन उपस्थित होते. प्रश्नांचा मोठा डोंगर जनता दरबारात उभा राहिला. मात्र अनेकांना आपल्या प्रश्नाला उत्तरच मिळाली नाहीत. त्यामुळे अनेकांची जनता दरबारात निराशा झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

हे वाचा...

उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे, ‘अंधेर नगरी, चौपट राजा’

नागपूरमध्ये भररस्त्यावर तरुणावर अंदाधुंद गोळीबार

First published: March 8, 2020, 1:55 PM IST
Tags: amol kolhe

ताज्या बातम्या