जमिनीच्या मोबदल्यासाठी मंगळवेढ्यात शेतकऱ्यांचा अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न

जमिनीच्या मोबदल्यासाठी मंगळवेढ्यात शेतकऱ्यांचा अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न

कंपनीच्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात, मंगळवेढा, 12 फेब्रुवारी : नागपूर - रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला न देता पोलीस आणि महसूल प्रशासनास पुढे करून दंडेलशाहीने महामार्गाचे काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. हे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत आहे.

शेतकऱ्यांकडून दिवसेंदिवस विरोध वाढत असून महामार्गाचे अधिकारी शेतकऱ्यांना दमबाजी करून काम करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसात मंगळवेढ्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. बुधवारी सकाळी गणेशवाडी येथील एका शेतकऱ्याने महामार्गाचे अधिकारी शेतात अवैधरित्या जाऊन काम सुरू करण्याच्या प्रयत्नात असताना अंगावर डिझेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलीस खात्याच्या समोर घडला.

खोमनाळ बायपास रस्त्यालगत मंगळवारी सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांच्या शेतात अधिकाऱ्यांनी काम करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तेथील शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.

सोन्याच्या अंगठ्या चोरताना अभिनेत्रीला अटक, पुण्यातल्या मॉलमधली घटना

अंधळगाव येथील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची रक्कम मिळाली नसतानाही सबंधित ठेकेदारांकडून शेतकऱ्यांना दमदाटी आणि बळजबरीने काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रकार घडला. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात फिर्यादी देण्यात आल्या आहेत.

First published: February 12, 2020, 10:30 PM IST
Tags: solapur

ताज्या बातम्या