मंगळवेढ्यात तरुणाने घरातच गळफास घेऊन केली आत्महत्या

मंगळवेढ्यात तरुणाने घरातच गळफास घेऊन केली आत्महत्या

तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात, मंगळवेढा, 19 जानेवारी : मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथे तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बापू हरिशचंद्र लोखंडे(वय25)असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरूणाने नेमकं कोणत्या कारणामुळे हे टोकाचं पाऊल उचललं याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मंगळवेढा तालुक्यातील कारखाना चौकातील पत्र्याच्या घरात केबलच्या वायरने बापू हरिशचंद्र लोखंडे(वय25)याने 18 जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याची माहिती मिळताच लोकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. याबाबतची फिर्याद हरिशचंद्र लोखंडे यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे.

डॉक्टरही झाले चकित! 4 गोळ्या लागल्यानंतरही महिलेनं 28 किमी चालवली गाडी

वडिलांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या 25 वर्षीय तरुणाच्या मृत्यूची नोंद अकस्मात म्हणून करण्यात आली आहे. याबाबत घोसळगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published: January 19, 2020, 3:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading