मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाबळेश्वरमध्ये भीषण अपघात! औरंगाबादच्या पर्यटकांची कार कोसळली नदीपात्रात

महाबळेश्वरमध्ये भीषण अपघात! औरंगाबादच्या पर्यटकांची कार कोसळली नदीपात्रात

महाबळेश्वरला औरंगाबादवरून फिरायला आलेल्या पर्यटकांच्या कारला केळघर घाटात भीषण अपघात झाला.

महाबळेश्वरला औरंगाबादवरून फिरायला आलेल्या पर्यटकांच्या कारला केळघर घाटात भीषण अपघात झाला.

महाबळेश्वरला औरंगाबादवरून फिरायला आलेल्या पर्यटकांच्या कारला केळघर घाटात भीषण अपघात झाला.

सातारा, 23 डिसेंबर: महाबळेश्वरला औरंगाबादवरून फिरायला आलेल्या पर्यटकांच्या कारला केळघर घाटात भीषण अपघात झाला. कार (एमएच 20-सीएस 9787) पूलावरून थेट नदी पात्रात कोसळली. बुधवारी दुपारी झालेल्या या अपघातात कारचालक जागेवरच ठार झाला. कारमधील इतर चार प्रवासी चमत्कारीत रित्या बचावले आहेत. अमित जोशी (वय-42, रा.औरंगाबाद) असं मृत तरुणाचं नाव आहे.

हेही वाचा...'मुंबईकरांनो, नाईट कर्फ्यूमध्येही तुम्ही रस्त्यावर फिरू शकता, फक्त...'

मिळालेली माहिती अशी की, नाताळाच्या सुट्टीनिमित्त औरंगाबादहून पाच पर्यटक महाबळेश्वरला फिरायला आले होते. फिरून झाल्यांनतर ते दुपारी 12 वाजेच्या सुमारास महाबळेश्वरहून साताऱ्याकडे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी आंबेघर येथील वेण्णा नदीवरील पूलावरून थेट खाली कोसळली. चालक अमित जोशी यानं गाडीतून उडी मारली मात्र दुर्दैवानं त्याचा गाडीखाली दबून जागीच मृत्यू झाला.

गाडीतील इतर पर्यटक यशराज पाटील (वय-18), समरजीत बछिरे (वय-17), संकेत पाटील (वय-16) व आयुष शेडगे (वय-17, सर्व रा. औरंगाबाद) हे सर्व जण अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी मेढा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृत कारचालक अमित जोशी यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या नाताळ आणि न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. गेल्या 9 महिन्यांपासून बंद असलेले पर्यटन स्थळी गर्दीनं फुलून गेली आहेत. सध्या धुके पडत असल्यानं अपघातही वाढले आहेत.

दुसरीकडे, राज्यातील पर्यटन स्थळावरील या छोट्या व्यावसायिकांना लॉकडाऊनच्या काळात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं. आता लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर उद्योग धंदे आता पूर्वपदावर येत आहे. हळूहळू करून सर्व उद्योग धंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता पर्यटन स्थळावरील वॉटर पार्क, जलक्रीडा आणि इनडोअर कार्यक्रमांना राज्य सरकारनं परवानगी दिली आहे

हेही वाचा...शिवसेना नेत्यानं लाटले 250 कोटी? किरीट सोमय्यांकडून ED कार्यलयात पुरावे सादर

राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. राज्यातील पर्यटन स्थळांना आधीच परवानगी देण्यात आली आहे. आता कंटेन्मेंट क्षेत्राबाहेर जलक्रीडा, नौकाविहार आणि मनोरंजनाचे इनडोअर कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली आहे.

First published: