महाराष्ट्राच्या TikTok स्टारने केली आत्महत्या

महाराष्ट्राच्या TikTok स्टारने केली आत्महत्या

TikTok स्टार आकाश हा कारचालक होता. आर्थिक परिस्थितीही त्याची बेताचीच होती. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर 20 ऑगस्ट : सोशल मीडियाचे दिवाने असणाऱ्या तरुणांना TikTokने वेड लावलंय. व्हिडीओ बनवून ते TikTok वर टाकून मित्र जोडण्याचं कौशल्य अनेकांनी मिळवलं आहे. प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या TikTokमुळे अनेक स्टारही निर्माण झालेत. सोलापुरातला आकाश जाधव हा असाच एक TikTok स्टार. TikTok वर त्याचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. आभासी दुनियेत स्टार असणाऱ्या या 27 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केलीय. या घटनेने आकाशचे फॉलोअर्स असणाऱ्या तरुणांना प्रचंड मोठा धक्का बसलाय.

आकाश जाधव याने काही वर्षांपूर्वी TikTok वर एक व्हिडीओ टाकला त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. नंतर आकाशला त्याचं वेडचं लागलं आणि तो विविध विषयांवर व्हिडीओ तयार करून TikTok वर टाकू लागला. त्याचे फॉलोअर्स वाढू लागले आणि तो काही महिन्यांमध्येच स्टारही झाला. मात्र सोशल मीडियावर सक्रिय आणि स्टार असणारा हा युवक वयक्तित आयुष्यात तणावात होता हे आता पुढं आलंय.

भीक नाही तर जनतेने जिव्हाळ्याने मदत केली, तावडेंचं खासदार संभाजी राजेंना उत्तर

आकाशने याच ताण-तणावातून झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि घराजवळच्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन तो झोपला. काही लोकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला आवाज देऊन उठवलं मात्र तो रेल्वे रुळाच्या बाहेर न येताच पुढे ट्रॅकवर जाऊन झोपला आणि एका मालगाडीच्या खाली आला. अकाश हा विवाहीत होता. या घटनेनं त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.

पुण्यातल्या 10 शिक्षण संस्थांना उघडायचं काश्मीरात कॉलेज!

आकाश हा कारचालक होता. आर्थिक परिस्थितीही त्याची बेताचीच होती. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे याचा आता पोलीस शोध घेत आहेत. सोशल मीडियाचं वेडं की कौटुंबीक कारण याबद्दल उलट सुलट चर्चा करण्यात येत असून तापासानंतरच खुलासा करता येवू शकेल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 20, 2019, 8:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading