महाराष्ट्राचा महासंग्राम : अक्कलकोटमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर

2014 च्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेनंतरही अक्कलकोटमध्ये मात्र काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रेंचा विजय झाला. पण गेल्या 4 वर्षांत इथली राजकीय समीकरणं बदलली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 05:02 PM IST

महाराष्ट्राचा महासंग्राम : अक्कलकोटमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर

अक्कलकोट, 9 सप्टेंबर : अक्कलकोट ही स्वामी समर्थांची नगरी म्हणून ओळखली जाते. काँग्रेसचा हा हक्काचा बालेकिल्ला पण लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा इथला प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळेच काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हेच भाजपकडून निवडणूक लढतील, अशी शक्यता आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेनंतरही अक्कलकोटमध्ये मात्र काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रेंचा विजय झाला. पण गेल्या 4 वर्षांत इथली राजकीय समीकरणं बदलली आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेला हा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षितच आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये इथे खून, मारामाऱ्या, वैयक्तिक आरोप - प्रत्यारोप हेच मुद्दे चर्चेत होते.

सिद्धराम म्हेत्रेंकडे लक्ष

1997 पासून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचं राजकारण हे सिद्धाराम म्हेत्रेंच्याच भोवती घुमतं आहे. 2009 ची विधानसभा वगळता त्यांनी अक्कलकोटमधून काँग्रेसला नेतृत्व दिलं. 2009 मध्ये सिद्धराम म्हेत्रेंचा भाजपचे सिद्रामप्पा पाटील यांनी पराभव केला. या दोघांमधलं वैर हे जगजाहीर होतं पण 2014 नंतर मात्र म्हेत्रे आणि पाटील एकत्र आले. याच काळात भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांनी संघटनात्मक कार्यावर भर दिला. त्यामुळे त्यांचाही राजकारणात प्रभाव वाढला आहे. एकीकडे भाजपकडे उमेदवारांची भाऊगर्दी झाली असली तरी म्हेत्रे भाजपमध्ये गेले तर  काँग्रेसला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

गणेश विसर्जनापूर्वी ठरणार 'युती'चा अंतिम फॉर्म्युला!

अक्कलकोट मतदारसंघात लिंगायत समाज हा सर्वाधिक आहे. त्याखालोखाल दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही मताधिक्य खेचण्याचा प्रयत्न केला. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना अक्कलकोटमधून 27 हजार 625 मतं मिळाली. वंचितला मिळालेल्या या मतांच्या संख्येमुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र लोकसभेत साध्य न झालेली ही युती विधानसभेत होईल असं चित्र सध्यातरी दिसत नाही.

Loading...

2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं

सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस – 97 हजार 333

सिद्रामप्पा पाटील, भाजप –79 हजार 689

===========================================================================================

SPECIAL REPORT: दापोलीच्या मतदारसंघात शिवसेना मंत्र्यांचा मुलगा मारणार बाजी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 05:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...