मंत्रालय म्हणजे आत्महत्या करण्याची जागा झालीय, अजित पवारांचा घणाघात

मंत्रालय म्हणजे आत्महत्या करण्याची जागा झालीय, अजित पवारांचा घणाघात

'आमचं सरकार आलं तर संपूर्ण कर्जमाफी देऊ, अशी कर्जमाफी दिली नाही तर पवारांची औलाद नाही.'

  • Share this:

हरिष दिमोटे शिर्डी 23 सप्टेंबर : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापत चाललंय. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी आणखी तीव्र झाल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. गेल्या काही वर्षांमध्ये मंत्रालयात काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. मंत्रालयातल्या वरच्या मजल्यांवरून उड्या मारल्या होत्या. त्यानंतर तिथे जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी घणाघाती आरोप केलाय. मंत्रालय म्हणजे मंत्रालय म्हणजे आत्महत्या करण्याची जागा झालीय असं अजित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, त्यामुळेच तिथे जाळ्या बसवाव्या लागल्या आहेत. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता अडचणीत आहे. महाराष्ट्रातल्या अडचणीवर मुख्यमंत्री काही बोलत नाही अशी टीकाही त्यांनी केली.

'तिकीट द्या नाहीतर पक्ष सोडतो', राष्ट्रवादीच्या नेत्याचे थेट शरद पवारांना आव्हान

कोरेगाव भिमाच्या दंगली मागचा मास्टरमांइड का सापडत नाही? असा सवालही त्यांनी केला. आमचं सरकार आलं तर संपूर्ण कर्जमाफी देऊ, अशी कर्जमाफी दिली नाही तर पवारांची औलाद नाही असंही ते म्हणाले. भाजपची मंडळी थोर पुरूषांची नावं घेऊन सत्तेवर आलेत. पण कोणतंही आश्वासनं पूर्ण केली नाहीत. गड किल्यात आता झमझम सुरू करणार आहेत. आम्ही बंद केलेले डान्स बार यांनी सुरू केलेत असा आरोपही त्यांनी केला.

'शरद पवारांनी  मुंडेंचं घर फोडलं नाही.'

राष्ट्रवादी काँग्रसला गळती लागल्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. पवारांनीच मुंडेंच घर फोडलं असा आरोप त्यांनी केला होता. अंतर्गत राजकारणासाठी पवारांनी ही कृती केल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळच मला पक्ष सोडावा लागला असा आरोपही त्यांनी केला होता. जयदत्त क्षीरसागर यांचा रोख हा धनंजय मुंडे यांच्यावर होता. क्षारसागर यांच्या या आरोपांना आता राष्ट्रवादीचे नेते जीतेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय. आव्हाड हे आता पवारांवर होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यात आघाडीवर आहेत. आव्हाड म्हणाले, क्षीरसागर यांनी इतिहासाचा विपर्यास करू नये, पवार यांनी मुंडे यांच घर फोडले नाही, त्याचा साक्षीदार मी होतो.

VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

बीडच्या राजकारणात मुद्दाम वेगळं वातावरण निर्माण करण्यासाठी जयदत्त क्षीरसागर बोलत आहेत. त्यांनी खालच्या पातळीचं राजकारण करू नये. आव्हाड पुढे म्हणाले, सरदार पटेल यांचा पुतळा दोन वर्षात सरकारने  केला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाची अजून फक्त चर्चाच होते. यावरून याचं छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम कळते असा टोलाही आव्हाड यांनी भाजपाला हाणला. भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने नवीन घोषणा केली. त्यावरही आव्हाड यांनी टीका केली.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 23, 2019, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading