• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला.. पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला.. पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

  • Share this:
कोल्हापूर,29 डिसेंबर: महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून कोल्हापूरात येणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत. सीमा प्रश्नावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बससेवा बंद करण्यात आली आहे. सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. नुकसान टाळण्यासाठी पोलिसांच्या आदेशानुसार बससेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद राहील, अशी माहिती मिळाली आहे. बेळगावमध्ये धिंगाणा.. कन्नड संघटनांचा बेळगावमध्ये धिंगाणा घातला आहे. कन्नड रक्षण वेदिका संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम उधळून लावू, असा इशाराही कन्नड रक्षण वेदिका संघटनेने दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा रविवारी (29 डिसेंबर) महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत आणि समस्त बेळगावकर सीमावासियांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. अनगोळ येथे आदर्श मल्टिपर्पज सोसायटी सभागृहात दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. युवा समिती पदधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, समितीप्रेमी नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शिवसैनिकांचं कन्नड संघटनेला जशास तसे उत्तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न वरून भाजप-शिवसेनेत जुंपली आहे. बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला होता. त्याचे पडसाद आता कोल्हापूरमध्ये उमटले आहे. सेनेच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न वरून कन्नड संघटनांचा बेळगावमध्ये धिंगाणा घातला होता. यावेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं आणि पुतळ्याला काळी शाई फासली. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप करत कर्नाटक सरकारचा युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजीही केली. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी कर्नाटकच्या बसेसवर दगडफेक केली आहे. उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून नवनिर्माण सेना अध्यक्षाची गोळ्या घालण्याची भाषा भाषावार प्रांतरचनेवेळी कर्नाटकात अडकलेल्या सीमाभागातील मराठी भाषिक आणि हा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त विधान कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले होते. मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. यानंतर एका कन्नड संघटनेच्या नेत्याने मराठी भाषिकांना थेट गोळ्या घालून हत्या करण्याची भाषा केली आहे. यामुळे याचे सीमाभागात संतप्त पडसाद उमटले असून या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याला मंजुरी देण्यात आल्यानंतर देशात पडसाद उमटले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. खासगी, सार्वजनिक मालमत्तेची हानी झाल्याच्या घटना वाढल्या होत्या. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी सार्वजनिक मालमत्ता व त्यात रेल्वेचे नुकसान करणाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्याची मागणी केली आहे. त्याचे संतप्त पडसाद उमटले. विविध संघटनांनी निषेध नोंदवला. पण, हाच संदर्भ देत भीमाशंकर यांनी ज्या पध्दतीने अंगडी यांनी रेल्वेबाबत भुमिका घेतली. यापद्धतीने सीमाप्रश्‍नाबाबत धाडस दाखवतील का? सीमाप्रश्‍न साठ वर्षे भीजत पडला आहे. या कालावधीत येथील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी कर्नाटकाची सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. काट्याप्रमाणे विषय रुततो आहे. त्यासाठी कायम स्वरुपी तोडगा म्हणून मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर गोळ्या घालून विषय संपविण्याची वादग्रस्त मागणी केली. याचे सीमाभागात पडसाद उमटले. निषेध नोंदविला जात असून, भीमाशंकरच्या विरोधामध्ये कारवाई करण्याची मागणी जोर धरली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न 60 वर्षे झाली. या कालावधीत समिती कार्यकर्त्यांनी सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी केली आहे. त्यावेळी मंत्री अंगडी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना गोळ्या घालण्याचे विधान करण्याचे धाडस का दाखविले नाही. तर गाठ शिवसेनेशी आहे: खासदार धैर्यशील माने खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्याचा केला निषेध केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे. कर्नाटक नवनिर्माण सेना संघटनेवर बंदी घाला, अशी मागणीही खासदार माने यांनी केली आहे. कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात सांगा, तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, हे पाहू असे आव्हानही खासदार माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेला केले आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: