उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून नवनिर्माण सेना अध्यक्षाची गोळ्या घालण्याची भाषा

उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून नवनिर्माण सेना अध्यक्षाची गोळ्या घालण्याची भाषा

अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता.

  • Share this:

कोल्हापूर,27 डिसेंबर: भाषावार प्रांतरचनेवेळी कर्नाटकात अडकलेल्या सीमाभागातील मराठी भाषिक आणि हा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त विधान कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले आहे.

मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. यानंतर एका कन्नड संघटनेच्या नेत्याने मराठी भाषिकांना थेट गोळ्या घालून हत्या करण्याची भाषा केली आहे. यामुळे याचे सीमाभागात संतप्त पडसाद उमटले. वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याला मंजुरी देण्यात आल्यानंतर देशात पडसाद उमटले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. खासगी, सार्वजनिक मालमत्तेची हानी झाल्याच्या घटना वाढल्या होत्या. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी सार्वजनिक मालमत्ता व त्यात रेल्वेचे नुकसान करणाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्याची मागणी केली आहे. त्याचे संतप्त पडसाद उमटले. विविध संघटनांनी निषेध नोंदवला. पण, हाच संदर्भ देत भीमाशंकर यांनी ज्या पध्दतीने अंगडी यांनी रेल्वेबाबत भुमिका घेतली. यापद्धतीने सीमाप्रश्‍नाबाबत धाडस दाखवतील का? सीमाप्रश्‍न साठ वर्षे भीजत पडला आहे. या कालावधीत येथील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी कर्नाटकाची सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. काट्याप्रमाणे विषय रुततो आहे. त्यासाठी कायम स्वरुपी तोडगा म्हणून मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर गोळ्या घालून विषय संपविण्याची वादग्रस्त मागणी केली. याचे सीमाभागात पडसाद उमटले. निषेध नोंदविला जात असून, भीमाशंकरच्या विरोधामध्ये कारवाई करण्याची मागणी जोर धरली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न 60 वर्षे झाली. या कालावधीत समिती कार्यकर्त्यांनी सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी केली आहे. त्यावेळी मंत्री अंगडी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना गोळ्या घालण्याचे विधान करण्याचे धाडस का दाखविले नाही.

तर गाठ शिवसेनेशी आहे: खासदार धैर्यशील माने

खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्याचा केला निषेध केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे. कर्नाटक नवनिर्माण सेना संघटनेवर बंदी घाला, अशी मागणीही खासदार माने यांनी केली आहे.

कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात सांगा, तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, हे पाहू असे आव्हानही खासदार माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेला केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2019 10:24 AM IST

ताज्या बातम्या