MH2.0: 28 व्या वर्षी आमदार झालेल्या प्रणितींनी MIM च्या नेत्याशी घेतला होता पंगा

MH2.0: 28 व्या वर्षी आमदार झालेल्या प्रणितींनी MIM च्या नेत्याशी घेतला होता पंगा

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • Share this:

मुंबई,25 सप्टेंबर: केंद्रीय माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला आमदार आहेत. मात्र, आता आमदार प्रणिती शिंदे एका वादात सापडल्या आहेत. आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी प्रणिती यांच्यासह तिघांवर सोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील दाजी पेठेतील व्यंकटेश नगरात मेकअप कीट वाटप केल्याप्रकरणी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथक क्रमांक 6 चे प्रमुख ईश्वर गिडवीर यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्याला आमदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत एक खास किस्सा घेऊन आलो आहे.

अल्पावधीत स्‍वत:ला सिद्ध करून दाखवलं..

प्रणिती यांनी 2001 मध्ये मुंबईच्या सेंट झेव्हिअर कॉलेजमधून कला शाखेत पदवी घेतली. त्यानंतर 2004 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबीची पदवी प्राप्त केली. दांडगा जनसंपर्क, धाडसी आणि मनमिळावू स्‍वभाव आणि प्रभावी वत्कृत्त्‍व कलेमुळे प्रणिती यांनी आपल्‍या वडिलांप्रमाणेच अत्‍यंत अल्पावधीत स्‍वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून त्‍यांनी राज्याच्या राजकारणात ठसा उमटवला आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरमधून त्या निवडून आल्या.

MIM च्या नेत्याशी घेतला होता पंगा...

सन 2014 मध्‍ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे सोलापुरातून विधानसभेवर निवडून आल्या. या निवडणुकीत अल्प मतांनी विजयी झाल्याने त्यांनी याचे खापर एमआयएमवर (MIM)फोडले होते. हा पक्ष राष्ट्रविरोधी असून, त्याच्यावर आणि त्याच्या नेत्यांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर यावर बराच वाद झाला होता. आयआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रणिती शिंदे यांच्याविरोधात थेट कोर्टात धाव घेतली होती. एमआयएमने प्रणिती यांना नोटीसही बजावली होती.

समाजसेवेत अधिक रस...

सुरुवातीला राजकाराणापेक्षा समाजसेवेत अधिक रस दाखवणाऱ्या प्रणिती यांना वडिलांकडूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. प्रणिती शिंदे यांनी 'जाईजुई विचार मंच' या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून भरीव काम केले आहेत. कला आणि संस्कृती, बालके, पायाभूत सुविधा, दलितांचा विकास, शिक्षण आणि साक्षरता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कामगार आणि रोजगार, अल्प आर्थिक सहकार्य आदी विषयांवर या संस्थेच्या माध्यमातून काम केले जाते.

VIDEO:माझे पैसे द्या, भाजी विकणाऱ्या महिलाचा पीएमसी बँकेत आक्रोश

Published by: Sandip Parolekar
First published: September 25, 2019, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading