..तर आता किल्ल्यात तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का?

..तर आता किल्ल्यात तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का?

भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारी ऐवजी बार आणि छमछम आणणार का? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,21 सप्टेंबर: भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारी ऐवजी बार आणि छमछम आणणार का? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नगर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.

भाजप कारखाणदारांचे कर्ज माफ करेल. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही, असे अमित शहा म्हणतात. शेतकऱ्यांनी यांचे काय घोडे मारले? असा सवाल राष्टवादीचे नेते शरद पवार यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांचे वाटोळे सुरू आहे. त्यांच्याकडे पहायला वेळ नाही आणि महाजनादेश यात्रा मात्र करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी झोपेत आहेत का, हे समजायला कारण नाही. 370 रद्द केले त्यांचे अभिनंदन मग 371 नुसार नागालंड, मणिपूर व इतर आठ राज्यात देशातील इतर राज्यातील नागरिक जमीन घेऊ शकत नाही. तेथे बदल का नाही? एका धर्माचे लोक राहतात. म्हणून काश्मिरला 370 कलम रद्द केले? असा सवालही पवार यांनी यावेळी केला.

शरद पवारांनी केले हे भावनिक Tweet..

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला एका टप्प्यात मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भावनिक ट्वीट (Tweet) केले आहे. 'मला आणखी काही नको. महाराष्ट्राने मला भरभरुन दिले आहे. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे,' असे पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 'राज्यातील जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केले, देशाचा संरक्षण मंत्री केले, 10 वर्षे कृषीमंत्री केले. जनतेने मला भरभरुन दिले आहे. आता मला आणखी काही नको.' असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

VIDEO:निवडणुकीच्या तारखातील 'त्या' 2 दिवसावर भुजबळांनी व्यक्त केला संशय, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 04:42 PM IST

ताज्या बातम्या