कॉंग्रेसच्या यादीनंतर सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत वाढला सस्पेन्स

कॉंग्रेसने आज घटस्थापनेच्या मुहुर्तावर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 51 उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 08:07 PM IST

कॉंग्रेसच्या यादीनंतर सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत वाढला सस्पेन्स

मुंबई, 29 सप्टेंबर: कॉंग्रेसने आज घटस्थापनेच्या मुहुर्तावर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 51 उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. यादीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात आले आहे. परंतु माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या यादीनंतर सातारा लोकसभेच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढला आहे. उदयनराजे भोसले यांना शह देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी रिंगणात उतरवण्याचा विचार कॉंग्रेसमध्ये सुरू आहे.

दरम्यान, सातारा लोकसभेच्या जागेबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. पण चव्हाण लोकसभा लढवण्यास फारसे उत्सुक नाहीत. सातारा जिल्ह्यात चव्हाण हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यामुळे आम्ही पुढील काही दिवसातच सर्वांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्यभर चर्चेत आहे. कारण विधानसभेसोबतच ही निवडणूक होणार असली तरी उदयनराजे यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार त्याचा निर्णय अजूनही झालेला नाही. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे.

राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत उदयनराजेंविरुद्ध उमेदवार कोण असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

उदयनराजे साताऱ्याचा गड कसा राखणार?

निवडणुकांच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता आहे. मात्र विधानसभा निवडणुकांसोबतच होत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या उदयनराजेंसाठी यांच्यासाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक समजली जात आहे. कारण 2014 च्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचं मताधिक्य कमालीचं घटलं आहे. शिवसेनेच्या तिकीटावर लढलेल्या नरेंद्र पाटील यांनी यावेळी उदयनराजेंची चांगलीच दमछाक केली. उदयनराजेंनी विजय मिळवला खरा पण मताधिक्य मोठ्या प्रमाणात झालेली घट ही त्यांच्यासाठी धक्कादायक होती. म्हणूनच विजयानंतरही त्यांनी 'मताधिक्य कमी होणं हा एकप्रकारे माझा पराभवच आहे' असं विधान केलं होतं.

Loading...

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 08:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...