पवारसाहेब एकदा 'आत' जाऊनच या, या मंत्र्याने दिला अजब सल्ला

पवारसाहेब एकदा 'आत' जाऊनच या, या मंत्र्याने दिला अजब सल्ला

शरद पवार यांनी ईडीने पाठवलेल्या नोटीस प्रकरणावरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,13 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीने पाठवलेल्या नोटीस प्रकरणावरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे.

राज्यमंत्री खोत पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारासाठी मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे आले होते. यावेळी खोत यांनी भाषणात बोलताना शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना आघाडी सरकारने किती तरी गुन्हे आमच्यावर दाखल केले होते. त्यामुळे आमची अनेक दिवस कोर्टात हेलपाटा मारण्यातच गेले होते. शरद पवार यांनी एकदा आत जाऊन आतली हवा कशी आहे, ते पाहून यावे. आत जेवायला काय मिळतं ते सुद्धा या माध्यमातून त्यांना समजेल. पवार येरवडामध्ये गेले तर महात्मा गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथेच राहावे, असा अजब सल्लाही खोत यांनी दिला आहे. तुरुंगात गेल्यानंतर तिथलं दुःख काय असतं, हे आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्यांना कळेल, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी यावेळी लगावला.

शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर विखारी टीका

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'मुख्यमंत्री म्हणतात आम्ही तयार आहोत, पण कुस्ती करायला समोर कुणीच राहिले नाही. पण कुस्ती ही पैलवानांसोबत करायची असते. या असल्यांसोबत नाही,' असा टोला लगावत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पलटवार केला आहे. यावेळी पवारांनी काही हातवारेही केले.

बार्शी इथं आयोजित राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपचा जोरदार समाचार घेतला. यावेळी शिवस्मारक, गड किल्ले भाड्याने देण्याचा मुद्दा आणि कलम 370 यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही लक्ष्य केले.'मागील वेळी भाजपने घोषणा केली की, शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन राज्य चालवू. पण अरबी समुद्रात एक विटही उभी केली नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने आश्वासन दिले ते खोटे करुन दाखवले. आता जिथे भवानी तलवार चमकली तिथे भाजप सेनेच्या कारकीर्दीत छमछम बघायला मिळणार का,' असं म्हणत शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

VIDEO: 40 वर्षांत तुम्ही काय केलं? गवत उपटलं; पक्ष सोडून गेलेल्यांवर पवारांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2019 06:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading