आरोप करणाऱ्यांनी विष्ठा खावी.. या मंत्रिमहोदयांनी केले हे वादग्रस्त वक्तव्य

आरोप करणाऱ्यांनी विष्ठा खावी.. या मंत्रिमहोदयांनी केले हे वादग्रस्त वक्तव्य

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुन्हा आमनेसामने आले आहेत.'कडकनाथ' कोंबडी यावेळी निमित्त ठरली आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर,(प्रतिनिधी)

कोल्हापूर, 1 सप्टेंबर: कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी 'आरोप करणाऱ्यांनी विष्ठा खावी', असे वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. कडकनाथ फसवणूक प्रकरणी सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माझ्या मुलगीची लग्नपत्रिका असल्याचे कागदोपत्री राजू शेट्टींनी स्पष्ट करावे. पुरावे दाखवले तर मी राजकारणातून संन्यास घेईन. मात्र, तो पुरावा त्यांनी भर चौकात दाखवावा आणि पुरावा दाखवता येणार नसेल तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी भर चौकात विष्ठा खावी,असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुन्हा आमनेसामने आले आहेत.'कडकनाथ' कोंबडी यावेळी निमित्त ठरली आहे. राजू शेट्टी तुम्ही लालूप्रसाद यादव यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले होते. लालूंवरही चारा घोटाळ्याचे आरोप होते, मग तुम्ही लालूप्रसाद त्यांचे साथीदार होता का? असा सवालही खोत यांनी यावेळी केला आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, कडकनाथ प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे आपण सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्यही केली आहे. राजकीय लढाई राजकारणाच्या पातळीवर लढायला हवी, आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्हीही लढाऊ आहोत. राजू शेट्टी यांना कोंबडीचे तांगडे खायची सवय आहे. त्यांना दुसरे काही आठवणार नाही. तांगडे खाणाऱ्यांनी आपल्या आईची शपथ घ्यावी.

सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. शेट्टी यांनी खोत यांना कोंबडी चोर म्हटले होते. राजकीय सूडबुद्धीने माझ्यावर आरोप केले गेले. लग्नपत्रिका दाखवली गेली पण मला मुलगी नाही, भाऊ नाही. माझ्या गावात 80 टक्के खोत आडनावाची कुटुंब आहेत. कोणीही माझे नाव लग्नपत्रिकेत टाकतात. महा रयत ऍग्रो आणि रयत क्रांती संघटना दोन शब्द समान असल्याने काही जण राजकीय पोळी भाजून घेत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

VIDEO: बंदुकीचा धाम दाखवून सराफावर दमदाटी; भरवस्तीत दुकानाची तोडफोड

Published by: Sandip Parolekar
First published: September 1, 2019, 10:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading